Cabinet Expansion News : मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्रिपदाचे वाटप गणेशोत्सवापूर्वी होणार; सुनील तटकरेंची माहिती

Sunil Tatkare News : राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही सहभागी झालो, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पालकमंत्रिपद देण्याचे निश्चित झाले आहे.
Hasan Mushrif-Sunil Tatkare
Hasan Mushrif-Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रिपदाचे वाटप होणार आहे. विस्तार होऊन नवीन मंत्री आणि पालकमंत्री हे गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण राज्यभरात स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. (Cabinet expansion and allocation of guardianship will be done before Ganeshotsav: Sunil Tatkare)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापूर येथे सभा होत आहे. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही सहभागी झालो, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पालकमंत्रिपद देण्याचे निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार सध्या राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवरसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

Hasan Mushrif-Sunil Tatkare
Munde On Ajit Pawar CM Post : अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार...? धनंजय मुंडेंनीच वर्षच सांगितले...

तटकरे म्हणाले की, कोल्हापूरचे पालकमंत्री कोण असणार, याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. पण, एवढं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांवर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येईल.

Hasan Mushrif-Sunil Tatkare
Dharashiv Loksabha : पंकजा मुंडेंसाठी संजय बनसोडेंचा आग्रह; काकांप्रमाणे पुतण्याही १९७२ ची पुनरावृत्ती करणार?

पुण्याच्या पालकमंत्रिपदावर पक्षाकडून करण्यात येत असलेल्या दाव्याबाबत तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीचा दावा किती ठिकाणी याची चर्चा करण्यापेक्षा आम्ही आता एकत्रित काम करायचे ठरविलेले आहे. त्यामुळे दावा माध्यमांमध्ये मांडण्यापेक्षा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तीनही पक्षांचे अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. पालकमंत्रिपदावरून काहीही वाद होणार नाही. आम्ही सर्व एका दिशेने चाललो आहोत. आमचे जेवढे मंत्री आहेत, तेवढी पालकमंत्रिपदे आमच्या वाट्याला येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif-Sunil Tatkare
Vaibhav Patil Join Ajitdada Group : वडील शरद पवारांसोबत, तर पुत्राने धरली अजितदादा गटाची वाट..!

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या सभेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी दिशा दिली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, कोल्हापूरच्या जिल्ह्यातील तपोवन मैदानात फार क्वचित मोठमोठ्या नेत्यांच्या सभा आजवर झाल्या आहेत. त्या मैदानात विराट सभा घेण्याचे धाडस केवळ हसन मुश्रीफच दाखवू शकतात, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com