Ajit Pawar : ‘एक मिनिट, तुला काही माहित नसतं, काही नाही’; दादांचा पारा का चढला?

Ajit Pawar On Eknath Shinde Nidhi : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना आज त्यांनी विविध विषयांवर बैठका घेतल्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मागील वर्षाच्या पालखी सोहळ्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालख्यांना 20 हजाराचा निधी देऊ केला होता. पालखी सोहळा जवळ आला असताना या निधीबाबत अध्याप तरी सरकारकडून कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांनाच सुनावलं आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विषयांवर बैठका घेतल्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, पुण्यात काल पण ठराविक काळात भरपूर पाऊस झाला. याबाबत आजच्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला तसेच हिंजवडी येथे साठलेल्या पाण्याबाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोना पार्श्वभूमीवर काही रूग्ण पाहिला मिळाले आहेत. पुण्यात, पिंपरीत रुग्ण संख्या कंट्रोलमध्ये आहे. आरोग्य मंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली असल्याचा अजित पवार म्हणाले.

दरम्यान त्यांनी आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातून जातात त्या संदर्भात बैठक घेतली. पालखी सोहळ्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. पाऊस चांगला झाल्याने आणि शेतीच्या पेरण्या उरकल्यामुळे यावेळी वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दिवेघाटामध्ये रस्त्याचे काम सुरू असून धोकादाय दरडी तसेच धोकादायक होर्डिंग हटवण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्याचेही अजित पवार म्हणाले.

दोन्ही पालख्या पुण्यामध्ये असताना वाहतूक मार्गामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विविध सूचना करण्यात आले आहेत. पालखी मार्गाच्या दरम्यान मेट्रोचे काम सुरू असून त्यांना देखील वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सोमवारपर्यंत हिंजवडी टाटा मेट्रो अडथळे दूर केले नाही तर दहा कोटी रुपये दंडा वसूल करण्यात येणार असल्याचा अजित पवार म्हणाले.

यावेळी वारकऱ्यांना निधी देण्यात आला नसल्यामुळे वारकऱ्यांच्या सरकारला विसर पडलाय का? असा सवाल विचारला असता अजित पवार चांगले संतापले. 'आम्हाला कुणाचा विसर पडला नाही, तुम्हाला काही माहित नसतं', अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला आहे.

वारकऱ्यांना वीस हजार निधी एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्याच प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील या वेळेस सगळ्यांचे लिस्ट बनवली आहे. सर्वांना मान आणि निधी योग्य तो मिळेल, अशीही माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com