Pandharpur-Mangalveda Politic's : अजित पवारांच्या भाजप पाठिंब्याचे आमदार समाधान आवताडेंना ‘टॉनिक’...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे आवताडे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Ajit Pawar-Samadhan Avatde
Ajit Pawar-Samadhan AvatdeSarkarnama
Published on
Updated on

Mangalveda News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांना होणार आहे. त्यामुळे अटीतटीची वाटणारी लढत अजित पवार यांच्या खेळीने आवताडे गटाकडे सध्यातरी झुकल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात त्याचे परिणाम निवडणुकीत दिसणार आहेत. (Ajit Pawar's alliance with BJP; Benefit to MLA Samadhan Avatde)

पंढरपूरच्या (Pandharpur) २०२१ च्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Avtade) हे विजयी झाले. आवताडेसमोर मंगळवेढ्यातील बसवेश्वर, चोखोबा स्मारकासह प्रलंबित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न ते त्यांच्या परीने सोडवित आहेत. अद्यापही त्या योजनेला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही. आमदार आवताडे यांना सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडी सरकारशी संघर्ष करावा लागला. मात्र, आमदारकीच्या वर्षभरानंतर त्यांना सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याचे भाग्य मिळाले. मात्र, त्यांच्यासमोर मंगळवेढ्याच्या (Mangalveda) प्रमुख समस्येचा डोंगर तसाच कायम आहे.

Ajit Pawar-Samadhan Avatde
Solapur News : प्रशांत परिचारकांवर भाजपकडून आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी; पृथ्वीराज जाचकांनाही ताकद...

समाधान आवताडे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा असतानाही त्यांना अजूनही गती मिळालेली नाही. दरम्यान, ज्यांनी आवताडेंच्या आमदारकीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या परिचारक गटाने वर्षभरापूर्वी झालेल्या श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांना विरोध करत कारखान्याची सत्ता हिसकावली. त्यामुळे परिचारक गट आणि आवताडे गट आज तरी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत, त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या विचार करता आवताडे यांना परिचारक गटाचा विरोध राहू शकतो. परिचारक गट आवताडेंपासून दुरावल्यामुळे बेरजेचे राजकारणासाठी आमदारांना मोठी कसरत करावी लागू शकते.

Ajit Pawar-Samadhan Avatde
Dhananjay Munde News: मला दोन मतांची गरज होती, त्यावेळी अजितदादांनी मदत केली अन्‌ मी आमदार झालो; धनंजय मुंडेंनी सांगितला किस्सा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे आवताडे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंगळवेढ्यात समर्थकांनी फटाके उडवून जल्लोष केला. महाविकास आघाडी सरकारप्रमाणे भविष्यात महायुतीचे सरकार होऊ शकेल, अशी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे, त्यामुळे अजित पवार समर्थकांचा स्टॅंडिंग आमदार म्हणून समाधान आवताडे यांना पाठिंबा मिळू शकतो. परिचारक गटामुळे मायनसमध्ये गेलेला आवताडे गट अजित पवार यांच्या पाठिंबामुळे पुन्हा प्लस मध्ये येऊ शकतो.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंढरपूर दौऱ्यामध्ये अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर तेच कसे योग्य उमेदवार आहेत, असा दावा उमेश पाटील व लतीफ तांबोळी यांनी केला होता. मात्र ते दोघेही आज अजित पवारांबरोबर आहेत, जर अजित पवार गटाने आवताडे किंवा भाजप उमेदवाराचे समर्थन केल्यास आवताडेंना फायदा होऊ शकतो.

Ajit Pawar-Samadhan Avatde
Sharad Pawar Letter to CM, DCM: शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह अजितदादांना पत्र...

सध्या राष्ट्रवादीमध्ये एकाकी पडलेले अभिजीत पाटील आपली उमेदवारीची मोळी घट बांधण्याच्या दृष्टीने येत्या काळात काय भूमिका घेतात, यावर बरेच चित्र अवलंबून आहे. भगीरथ भालके यांनी बीआरएसला पाठिंबा देत आपण संभाव्य उमेदवार असल्याचे जाहीर करून टाकले आहे, त्यामुळे २०२४ ची निवडणूक ही मोठी रंगतदार ठरणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com