Solapur News : प्रशांत परिचारकांवर भाजपकडून आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी; पृथ्वीराज जाचकांनाही ताकद...

पृथ्वीराज जाचक यांनाही ऊसदर नियंत्रण मंडळामध्ये घेत पवारविरोधकांना ताकद देण्याचे कामही भाजपकडून सुरू आहे.
Prashant Paricharak-Prithviraj Jachak
Prashant Paricharak-Prithviraj JachakSarkarnama
Published on
Updated on

Sugarcane Price Control Board : माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपदानंतर त्यांची वर्णी ऊसदर नियंत्रण मंडळामध्ये लावण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे समाधान आवताडे यांना विधानसभेची वाट मोकळी करून देताना प्रशांत परिचारक यांनाही ताकद देण्याचे काम पक्षाकडून करण्यात येत आहे. (Selection of Prashant Paricharak, Prithviraj Jachak to Sugarcane Price Control Board)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली इंदापुरातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशासनाविरोधात लढणारे राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) यांनाही ऊसदर नियंत्रण मंडळामध्ये घेत पवारविरोधकांना ताकद देण्याचे कामही भाजपकडून (BJP) सुरू आहे.

Prashant Paricharak-Prithviraj Jachak
Sharad Pawar Letter to CM, DCM: शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह अजितदादांना पत्र...

ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची राज्य सरकारकडून गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. त्यात सहकारी साखर कारखान्याच्या गटातून माजी आमदार तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), नगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांची निवड करण्यात आली आहे.

खासगी साखर कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीरोज उद्योगचे संचालक दामोदार हरिभाऊ नवपुते, तर नागपूरमधील मानस ॲग्रो इंडिस्ट्रीजचे आनंदराव राऊत यांना संधी देण्यात आलेली आहे. शेतकरी प्रतिनिधी गटातून सुहास पाटील (माढा, जि. सोलापूर), सचिनकुमार नलावडे (कराड, जि. सातारा), पृथ्वीराज जाचक (इंदापूर, जि. पुणे), धनंजय किसनराव भोसले (औसा, जि. लातूर), योगेश माधवराव बर्डे (दिंडोरी, जि. नाशिक) यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Prashant Paricharak-Prithviraj Jachak
Dhananjay Munde News: मला दोन मतांची गरज होती, त्यावेळी अजितदादांनी मदत केली अन्‌ मी आमदार झालो; धनंजय मुंडेंनी सांगितला किस्सा

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर पोटनिवडणकीत माघार घेऊन आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी त्याग केला होता. राज्यात सरकार आल्यानंतर मात्र परिचारक यांना ताकद देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गावे येतात. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपद हे परिचारक यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे. त्यानंतर काल त्यांची ऊसदर नियंत्रण मंडळावर नियुक्ती करत त्यांच्यावर आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Prashant Paricharak-Prithviraj Jachak
Savta Parishad Support to Ajit Pawar : राज्यातील सावता परिषद अजित पवारांच्या पाठीशी; पंढरपुरात जाहीर केला निर्णय

इंदापूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी पर्यायाने पवारांशी दोन हात करणारे पृथ्वीराज जाचक यांनाही मंडळावर घेत भाजपने एक राजकीय डाव खेळला आहे. इंदापुरातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळलेले जाचक सध्या राष्ट्रवादीच्या संचालकांविरोधात लढत आहेत. त्यांना ऊसदर नियंत्रण मंडळावर घेत सत्तेची ऊब देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com