Karad Political News : अजितदादा नाराज नाहीत; मंत्री गिरीश महाजनांनी सांगितले हे कारण...

Girish Mahajan मंत्री गिरीश महाजन सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमास रवाना होण्यासाठी कराड येथील विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
AJit Pawar, Girish Mahajan
AJit Pawar, Girish Mahajansarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी व दिवसभरातील आणि कार्यक्रमासाठी अनुपस्थित होते. त्यांचे त्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले होते. त्यामुळे ते नाराज आहेत असे म्हणण्यात अर्थ नाही असे स्पष्ट मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कराड ( जि. सातारा) येथे व्यक्त केले.

मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमास रवाना होण्यासाठी कराड Karad BJP येथील विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी, दिलीप वळसे पाटील व अन्य मंत्री उपस्थित होतो . मात्र त्यांची तब्येत खराब असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित नव्हते. माझ्यासमोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे बोलणे झाले होते.

काल दिवसभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले. अजितदादांच्या बंगल्यावरील कार्यकमासही कार्यक्रमाचे त्यातही ते उपस्थित नव्हते. सध्या अनेकजण यांचे कसे फाटेल यासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यामुळे ते आपापल्या पद्धतीने अर्थ काढत आहेत.

AJit Pawar, Girish Mahajan
Amol Kolhe In Satara : चिमुकल्याचा खासदार अमोल कोल्हेंना राजकीय सल्ला; म्हणाला, 'शरद पवारांची साथ...'

निवडणुका आम्ही लांबणीवर टाकत नाही...

निवडणुका लांबणीवर टाकून सरकार निवडणुकांसाठी घाबरत आहेत, या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले, निवडणुकीसाठी सरकार भीत आहे हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करायचा हे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे.

Edited By Umesh Bambare

AJit Pawar, Girish Mahajan
Pune Crime News : हिंजवडीतील कोट्यवधी रुपयांच्या मेडिकल प्रवेश फसवणुकीचं 'पुणे कनेक्शन'; अॅडमिशनची बोगसगिरीही उघड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com