Ajit Pawar : विरोधकांचा आवाज सन्मानाने ऐकण्याची परंपरा अजितदादांनी जपली : माजी आमदार आडम मास्तरांची प्रतिक्रिया

Narasaiah Adam Master : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने महाराष्ट्रात शोककळा पसरली असून अनेक सार्वजनिक व्यक्तींनी दुःख व्यक्त केले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 Janaury : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (ता. 28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात बारामतीत अकाली मृत्यू झाला. या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या या मृत्यूवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी शोक व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे केवळ सत्ताधारी नेते नव्हते, तर कामगार, श्रमिक, कष्टकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे नेतृत्व होते. वैचारिक मतभेद असूनही लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची त्यांची तयारी आणि निर्णय घेण्याची क्षमता ही लोकशाहीची खरी ताकद होती, अशा शब्दांत माजी आमदार आडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, विधानसभेत आम्ही अनेक वेळा कामगार, बीडी कामगार, बेघर नागरिक, झोपडपट्टीवासीय व वंचित घटकांचे प्रश्न मांडले. त्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ ऐकूनच घेतले नाही, तर अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar Plane Crash : अखेरच्या क्षणापर्यंत कामाचा ध्यास..., अजितदादांची एक्सवरील शेवटची पोस्ट चर्चेत

विरोधकांचा आवाज सन्मानाने ऐकण्याची परंपरा अजित पवार यांनी कायम जपली होती, असेही माजी आमदार आडम यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar Died : पहाटेपासूनच अजितदादांचा दिनक्रम सुरु व्हायचा; नियतीनेही 'वेळ' साधली, सकाळीच घेतलं हिरावून

माजी आमदार आडम म्हणाले, राजकारण म्हणजे संघर्ष असतो, पण तो जनतेच्या हितासाठी असावा, ही भूमिका अजित पवार यांनी कायम कृतीतून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com