Ajit Pawar News : अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना दम; 'दुसरीकडे सहज गेलो असे म्हणाल तर मीही सहजच नाव वगळेल'

Baramati News : पक्षाला वेळ देण्याचेही केले पदाधिकाऱ्यांना आवाहान
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati NCP : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बारामती कामाला सुरूवात केली. बारामती आज (ता. २७) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (NCP) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी पदाधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच निवडणूक आली की कार्यकर्ते, पदाधिकारी गट बदलतात. या अनुभवावरून पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थासह विधानसभा, लोकसभेत निवडणूक लागताच अनेक जण गट, पक्ष बदलतात. त्याच पार्श्वभूमिवर या सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना (Baramati NCP) चांगलीच तंबी दिली आहे. पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात विरोधी गटात जायचे नाही. गेल्यानंतर नाही...सहज गेलो होतो... असली कारणे द्यायची नाहीत. तसले काही ऐकून घेणार नाही. तुम्ही सहज गेला म्हणाला तर मीही तुमचे नाव सहजच नाव वगळले, असे तुम्हाला सांगेन."

Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवार म्हणाले अध्यक्षमहोदय...; अन् प्रेक्षकांसह त्यांनाही आवरले नाही हसू

बारामतीतील हा मेळावा हस्यविनोदात पार पडला आहे. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना सांगायचे ते पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या शैलीत अचूकपणे पोहचविले. यावेळी पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी वेळ देण्याचे आवाहनही केले आहे. यावेळी काही पदाधिकारी नागरिकांशी नीट वागत नसल्याचा तक्रारी आल्या होत्या. त्या चिठ्ठ्यांचे त्यांनी जाहीर वाचन केले. त्यानंतर लोकांशी नीट वागा, असा सल्लाही दिली.

Ajit Pawar
Ahmednagar Bank On Ajit Pawar; अहमदनगर जिल्हा बँकेत काय घडले? अजितदादा म्हणाले, दिवसा आमच्याकडे अन् रात्री तिकडे

निवडणुकांत बूथ कमिटी कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील किमान 25 कुटुंबासोबत संपर्क साधा. हे करताना मात्र दुसरे काहीही करू नका. वैयक्तिक संपर्क साधू नका. व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवू नका. माझ्याकडे अशा तक्रारी आल्या तर कुणालाच सोडणार नाही, असा दमही यावेळी पवार यांनी दिला.

अजित पवार स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. कुणी चुकले भरसभेत त्यांनी संबंधितांची खरडपट्टी काढल्याची अनेक उदाहरणे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com