Ajit Pawar News : अजित पवार म्हणाले अध्यक्षमहोदय...; अन् प्रेक्षकांसह त्यांनाही आवरले नाही हसू

Baramati News : पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीबाबत नागरिकांनी दिलेल्या चिठ्ठ्यांचे जाहीर वाचन
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar in Baramati : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व आपल्या पक्षातील नेत्यांसह विरोधकांना चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते. आपल्या बिनधास्त भाषणाच्या शैलीसाठी पवार प्रसिद्ध आहेत.

अजित पवारांनी आज बारामती येथील सभेतील भाषणादरम्यान अचानकच 'अध्यक्ष महोदय...' असे म्हटल्यानंतर सभागृहात प्रचंड हशा झाला. आपल्याकडून विधानसभेतील भाषणाप्रमाणेच जाहिर भाषणात अध्यक्षमहोदय असा शब्द गेल्याचे अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनाही बराच काळ हसू आवरले नाही. या घटनेने वातावरण हलकेफुलके झाले.

Ajit Pawar
Satara : टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये...शिवेंद्रराजे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आयोजित राष्ट्रवादीच्या (NCP) मेळाव्यात हा किस्सा घडला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज शांतपणे पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी वेळ देण्याचा सल्ला देत खडे बोल सुनावले.

आपल्याकडे आलेल्या चिठ्ठ्यांचे वाचन करतानाच काही जण पनवलेलला जातात, काही पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आल्यावर त्यांनाच अधिक वेळ देतात. तुम्हाला संचालक करणार असे काही जण सांगतात. तर तुम्ही व सुप्रिया सुळे (Supriya Sule) बारामतीतून (Baramati) गेल्यावर आपणच आमदार खासदार आहोत, अशा थाटात काही जण वावरतात. या चिठ्ठ्यांचे अजित पवार यांनी जाहीर वाचन केल्याने हा रोख नेमका कोणावर याचीच नंतर चर्चा सुरु होती.

Ajit Pawar
Amrita Fadnavis blackmail case : अमृता फडणवीस धमकी प्रकरण; अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

पदाधिकाऱ्यांनी लोकांशी नीट वागावे, माझ्यासारखे वागायची गरज नाही, असे पवार म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हास्याचा स्फोट झाला. बूथ कमिटी कार्यकर्त्यांनी 25 कुटुंबासोबत संपर्क साधताना दुसराच संपर्क साधू नका, व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवू नका. माझ्याकडे अशा तक्रारी आल्या तर मी सोडणार नाही, असा दमही यावेळी पवार यांनी दिला. तसेच अशा कृत्याने पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल, याची जाणीवही करून दिली. नितीन गडकरी यांना मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या असून ते अत्यंत सकारात्मक असतात, अशी पावती द्यायला अजित पवार विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com