Ajit Pawar- Jayant Patil News : जयंत पाटलांना शह देण्यासाठी अजितदादांची वाकडी वाट

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या बंडानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खंबीरपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले.
Ajit Pawar- Jayant Patil News :
Ajit Pawar- Jayant Patil News :Sarkarnama

Sangali Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या बंडानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खंबीरपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले. जयंत पाटील यांचा आवाका आणि सांगली जिल्ह्यात असलेली ताकद यामुळे जिल्ह्यात अजितदादांच्या गटाला विशेष पाठिंबा मिळाला नाही. पण आता हळूहळू राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षही वाढत चालल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपुरातच जयंत पाटील यांना शह देण्यासाठी रणनीती आखली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील हा एकमेव जिल्हा शरद पवार यांच्या सोबत राहिला, पण जयंत पाटील यांच्याच मतदारसंघातील विरोधकांवर अजित पवारांच्या गटाकडून दबावतंत्र वापरले जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सगळ्या घडामोडींनंतर अजितदादा पहिल्यांदा या भागात येत आहेत. अजित पवार आज सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. अजितदादा यांना मानणारे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत.

Ajit Pawar- Jayant Patil News :
Rishi Sunak Visit Akshardham Mandir : ऋषी सुनक सपत्नीक अक्षरधाम मंदिरात; स्वामीनारायण देवाचे घेतले दर्शन!

जयंत पाटील यांच्या मतदारसंघात भाजपमध्ये असलेले महाडिक कुटुंब अजितदादांचे स्वागत करणार आहे. पेठ नाका येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. जयंत पाटील यांना शह देण्यासाठीच ही खेळी असल्याचं स्पष्ट आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात महाडिक परिवारातील राहुल महाडिक विधानसभेसाठी तयारी करत आहेत. अजितदादा भविष्यात त्यांना ताकद देणार हेही या दौऱ्यामुळे स्पष्ट झाले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com