बिजवडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी व समस्यांचे निवारण करून भक्कम पाठबळ देण्याकरिता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करण्यात आली आहे. या सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायातील युवकांचे मार्गदर्शक ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारकरी संप्रदायातील युवकांनी एकत्र येऊन युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तथा संत साहित्य जगभरात प्रसारित व्हावे याकरिता वारकरी संप्रदाय युवा मंच या संघटनेची माध्यमातून अक्षयमहाराज भोसले मागील अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. या संघटनेत वारकरी संप्रदायासाठी १५००० पेक्षा अधिक सुशिक्षित युवक काम करत आहेत.
अक्षय महाराज भोसले हे वारकरी संत साहित्याचे अभ्यासातून समाज प्रबोधनपर कीर्तने, वारकरी संप्रदायाचा प्रचार, समाजसेवा, व्यसनमुक्ती, अंधविश्वास दूर करणे, वारकरी संत साहित्यांचा जागर, वारी ऑन सोशल मिडिया, कीर्तनातून राष्ट्रीयत्वाची शिकवण, घरातून ग्रंथालयाची सुरुवात, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, व्यसनमुक्तीसाठी कार्य, युवकांशी संवाद, स्त्री सक्षमासाठी कार्य, अनेक लेखांच्या माध्यमातून समाज माध्यमांवर पकड असलेले अक्षयमहाराज सर्वश्रुत आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी अक्षयमहाराज भोसले यांना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री दादासाहेब भुसे , खासदार राहुल शेवाळे, पक्षाचे सचिव संजय मोरे सर, म्हस्के सर व पक्ष प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे व पक्षातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.