Makai Sugar Factory Election : मातब्बर विरोधकांचे अर्ज बाद; 'मकाई'ची सत्ता चौथ्यांदा मिळविण्याकडे बागलांची वाटचाल

‘सरकारनामा’ने मांडलेले ’बागलांकडून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम : मकाई बिनविरोध होण्याच्या मार्गावर?’ हे विश्लेषण तंतोतंत खरे ठरले आहे.
Makai Sugar Factory Election
Makai Sugar Factory ElectionSarkarnama

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाच्या विरोधात दाखल करण्यात आलेले मातब्बरांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे मकाई सहकारी साखर कारखान्याचा बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे बागलांची चौथ्यांदा सत्ता मकाई कारखान्यावर येणार आहे, त्याची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ‘सरकारनामा’ने मांडलेले ’बागलांकडून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम : मकाई बिनविरोध होण्याच्या मार्गावर?’ हे विश्लेषण तंतोतंत खरे ठरले आहे. (All applications of Bagal opponents rejected: Bagals rule over Makai factory for the fourth time)

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) १७ जागांसाठी ७५ उमेदवार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, तर ३६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोपे यांनी सांगितले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विजयकुमार जाधव व दुय्यम निबंधक दिलीप तिजोरे हे काम पाहत आहेत.

Makai Sugar Factory Election
Makai Sugar Factory : बागलांकडून विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम' : मकाई कारखाना बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

स्थापनेपासून मकाई कारखान्यावर बागल गटाची एकहाती सत्ता राहिली आहे. मकाई कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे, अशा परिस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत प्रा रामदास झोळ यांनी सुरुवातीपासूनच मकाई बचाव समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचे दिवशी मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले यांनी पॅनेल उभा करत उमेदवार अर्ज दाखल केले होते. त्यांच्या एन्ट्रीमुळे मकाईची निवडणूक प्रक्रिया रंगतदार अवस्थेत आली होती.

बागल विरोधात ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांच्याकडे आदिनाथ कारखान्याचा शेअर्स अपूर्ण असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. हा आक्षेप ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोपे यांनी सोमवारी बागल विरोधातील अर्ज बाद ठरविले आहेत. त्यांनी वैध आणि अवैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. अवैध यादीमध्ये मोहिते समर्थक सविताराजे भोसले, रामदास झोळ, माया झोळ, गणेश चौधरी यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.

Makai Sugar Factory Election
Jayant Patil ED Enquiry : कार्यकर्त्यांनो, मुंबईला येऊ नका : जयंत पाटलांचे आवाहन

या मुद्द्यांच्या आधारे मातब्बर विरोधकांचे अर्ज बाद

पाच गळीत हंगामापैकी तीन गळीत हंगामात मकाई साखर कारखान्याला ऊस न घालणे, जातीचा दाखला नसणे, उमेदवार, अनुमोदक, सूचक एकाच मतदारसंघातील नसणे, मतदार यादीत नाव नसणे, या मुद्द्यांच्या आधारे बागल विरोधकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोपे यांनी अवैध ठरवले आहेत. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची वाढीव शेअर्स रक्कम व इतर देणे येणे बाकी या मुद्द्याच्या आधारे एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेला नाही.

गटनिहाय वैध ठरलेले उमेदवार

भिलारवाडी- आप्पा जाधव, सुनीता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झांजुर्णे, बाबुराव आंबोदरे, संतोष झांजुर्णे.

चिखलठाण- सतीश नीळ, दिनकर सरडे, निर्मला इंगळे, आप्पासाहेब सरडे

वांगी- सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनिषा दौंड, अमित केकान

मांगी : दिनेश भांडवलकर, रोहीत भांडवलकर, अमोल यादव, रवींद्र लावंड, सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे

पारेवाडी : उत्तम पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, संतोष पाटील, स्वाती पाटील, गणेश चौधरी

अनुसुचित जाती : आशिष गायकवाड, सुशमा गायकवाड,

इतर मागास : अनिल अनारसे

महिला राखीव : सुनिता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ

भटक्या विमुक्त जाती : बापू चोरमले, राजश्री चोरमले

इतर संस्था : नवनाथ बागल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com