Maan News : शासनाचे सगळेच जी. आर. खरे असतात का..? फडणवीसांचे अजब वक्तव्य

Ramhari Rupanvar धनगर समाज आरक्षणाबाबत काल सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीतील वृत्तांत माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी उपस्थितांना सांगितला.
Dahiwadi Dhangar Andolan
Dahiwadi Dhangar Andolansarkarnama
Published on
Updated on

-रूपेश कदम

Mumbai Meeting News : धनगर समाजासह आदिवासी समाजाला न्यायालयात जाताना स्टँप ड्यूटी माफ आहे, असा जी. आर. शासनाने काढल्याचे व त्याची प्रत दाखवून त्यात धनगर असेच लिहिल्याचे माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवले. त्यावर शासनाचे सगळेच जी. आर. खरे असतात का, असे अजब वक्तव्य फडणवीस यांनी काल मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केले. त्यावर मग कोणाचे खरे असतात, असा प्रश्न रूपनवर उपस्थित केला.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत Dhangar Reservation काल सह्याद्री अतिथिगृह येथील बैठकीतील वृत्तांत माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितला. रामहरी रूपनवर म्हणाले, कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देतो. निकाल तुमच्या बाजूने घ्यायची जबाबदारी माझी, अशी वक्तव्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी केली पण ती खोटी ठरली.

आता ते म्हणताहेत न्यायालयाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल याची जबाबदारी माझी. ही त्यांची जबाबदारी कशी? आम्हाला घटनेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून आरक्षण लागू करा, अशी आमची मागणी आहे. २९ मे २०१७ ला शासन निर्णय काढून आमचे भटक्या जमातीचे आरक्षण काढून घेतले.

बिंदू नामावली बदलली. सहा नंबरवर असलेला धनगर ९६ नंबरवर कसा गेला. महाराष्ट्रातील लोकसंख्येने दोन नंबरचा समाज धनगर आहे. तो पेटला आहे. तो जर विझलाच नाही तर कोणाकोणाची राख करेल समजणार नाही. सरकारच्या समितीत आमचे चार कार्यकर्ते पाहिजेत. उपोषण सोडणे न सोडणे हा निर्णय उपोषणकर्त्यांचा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By Umesh Bambare

Dahiwadi Dhangar Andolan
Maan News : उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री नको मुख्यमंत्र्यांनीच यावे : धनगर समाज आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com