कर्जत-जामखेडमधील रस्त्याच्या कामात अपहाराचा आरोप : चार सदस्यीय समिती चौकशी करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्तासंघर्ष आहे.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama

Ram Shinde : कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यात सत्तासंघर्ष आहे. अशा स्थितीत कर्जत-जामखेडमधील पानंद रस्त्यांच्या कामात 20 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

या समितीबाबत माहिती देताना राम शिंदे म्हणाले, पालकमंत्री पानंद रस्ते योजना व रोजगार हमी योजनेंतर्गत पानंद रस्ते कामात कर्जत - जामखेड तालुक्यात 20 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी चार सदस्यीय समिती मार्फत सखोल चौकशी करून एक महिण्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Ram Shinde Vs Rohit Pawar
नागेश पवार मृत्यूप्रकरणी रोहित पवार, राम शिंदेंनी उठविला विधीमंडळात आवाज

ते पुढे म्हणाले, की पालकमंत्री पानंद रस्ते व रोजगार हमी योजनेंतर्गत कर्जत-जामखेड तालुक्यात झालेल्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी या तीन अन्य सदस्यांचा चौकशी समितीत समावेश आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिवांना तर रोजगार हमी मंत्री संदिपान भूमरे यांनी रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त मुख्य सचिवांना तातडीने चौकशी करून, एक महिण्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

कर्जत जामखेड तालुक्यात निकृष्ठ दर्जाचे पानंद रस्ते झाल्याप्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या होत्या.तर जामखेड तालुक्यातील साकत, घोडेगाव येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केले होते. आमदार प्रा राम शिंदे यांनी ही बाब गांभीर्याने घेत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्र उपस्थित केला.याप्रकरणी आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व रोजगार हमी मंत्री भूमरे यांच्याकडे तक्रार करून, चौकशीची मागणी केली होती.

Ram Shinde Vs Rohit Pawar
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

त्यांनी सांगितले की, कोट्यवधी रूपये खर्चाचे पानंद रस्ते करताना प्रत्यक्ष कोणतीही विहीत प्रक्रिया राबवली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता लेखाशिर्ष इतर जिल्हा योजनेतून उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचेकडील प्रशासकीय मान्यताप्राप्त योजनेतील कामांना मंजूरी दिली आहे. मात्र सदर रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत.

या योजनेतून केलेली कामे ही अस्तित्वातील रस्त्यांपेक्षाही दर्जाहिन झालेली आहेत. या कामांच्या टिकाऊपणाची शाश्वती देण्यात आलेली नाही. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा अपहार झाला असून, कामांची बिले बोगस लाभार्थींच्या नावे अदा केली आहेत. कामे यंत्रसामुग्रीने केली असली तरी या कामांचे लॉगबुक उपलब्ध नसल्यामुळे यात शंका निर्माण होत आहे.केलेली कामे ही ग्रामपंचायत आराखड्याप्रमाणे नसल्याने महाराष्ट शासन नियोजन विभाग, शासन निर्णयाच्या अटी व शर्तीचे पुर्णता उल्लंघन झाले आहे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
मित्राच्या मदतीला धावून आले रोहित पवार ; म्हणाले, आदित्य ठाकरेंना सहानुभूती मिळेल..

पालकमंत्री पानंद रस्ते व रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्यांसाठी कर्जत- जामखेड तालुक्यात राज्य सरकारकडून 14 कोटी रुपयांचा तर जिल्हा नियोजन विभागामार्फत 5 कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. मात्र पानंद रस्ते कसताना कोणतीही प्रशासकीय विहीत प्रक्रिया राबवली गेली नाही. रस्त्याच्या दर्जाबाबत कोणत्याही सबंधीत अभियंत्याच्या देखरेखीखाली काम झालेले नाही. झालेल्या कामाचे मोजमाप अंदाजे करून, ठेकेदारांना पैसे अदा करण्यात आले आहेत.

ही कामे करताना स्थानिक ग्रामपंचायतीला याबाबत काहीही कल्पना देण्यात आलेली नाही. संपुर्ण कामाची निविदा प्रक्रिया न राबवता कामाचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खिरापत वाटल्यासारखे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशातून करण्यात आलेली ही कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी रस्तेच न करता, कामे कागदावर दाखवून बील काढण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी होवूनही केवळ लोकप्रतिनिधीच्या दबावातून स्थानिक प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लश केले होते, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com