गोरे बंधूंची युती उघड... स्वाभिमानी जनतेने अभद्र युतीला नाकारले...

दहिवडी सोसायटीचा Dahiwadi Society Election निकाल Result रविवारी लागला. यात राष्ट्रवादीने NCP अकरा जागा जिंकत सत्ता राखली तर भाजप-सेना युतीला BJP Sena Alliance फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.
Shekhar Gore, Jaykumar Gore
Shekhar Gore, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

दहिवडी : आजपर्यंत लोकांच्यात सुरु असलेली गोरे बंधूंची छुपी युती विकास सेवा सोसायटी निवडणूकीच्या निमित्ताने उघड झाली, असे मत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी व्यक्त केले. तर स्वाभिमानी जनतेने अभद्र युतीला नाकारले, असा टोला दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ यांनी लगावला आहे.

माण तालुक्यातील दहिवडी विकास सेवा सोसायटीचा निकाल रविवारी लागला. यात राष्ट्रवादीने अकरा जागा जिंकत सत्ता राखली तर भाजप-सेना युतीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, राष्ट्रवादीचे गट नेते सुरेंद्र मोरे, बांधकाम समिती सभापती महेश जाधव, महेंद्र जाधव, सुरज गुंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Shekhar Gore, Jaykumar Gore
दहिवडी सोसायटी : राष्ट्रवादीला रोखण्यासाठी गोरे बंधूंचे गट एकत्र

बाळासाहेब सावंत म्हणाले, ''आमदार जयकुमार गोरे व जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर गोरे या गोरे बंधूच्यात छुपी युती असल्याची चर्चा वारंवार होत असते. मात्र, दहिवडी सोसायटी निवडणूकीच्या निमित्ताने त्यांचे गट एकत्रित येवून लढल्याने ही युती उघड झाली. बाहेरील लोकांच्या हे नजरेस येवू नये म्हणून जाहिरात पत्रिका, फलकांवर दोघांची छायाचित्रे टाकली नाहीत.''

Shekhar Gore, Jaykumar Gore
प्रभाकर देशमुख ठरवणार दहिवडीचा नगराध्यक्ष..!

सागर पोळ म्हणाले, ''गोरे बंधूंच्या अभद्र युतीला स्वाभिमानी जनतेने नाकारून पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर विश्वास टाकला आहे.'' महेश जाधव म्हणाले, ''राष्ट्रवादी सोबत तरुणांची मजबूत फळी असून जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीनंतर सोसायटीत सुध्दा राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. सुरेंद्र मोरे म्हणाले प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीत काम करुन सभासदांची अपेक्षा पुर्ती केली जाईल. सुरज गुंडगे म्हणाले विरोधकांनी कितीही अन कसेही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादीचा विजयी वारु ते रोखू शकणार नाहीत.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com