Rajaram Sugar Factory News : निवडणुकीला चार महिने झाले तरी सतेज पाटलांना पराभव पचवता आला नाही ; अमल महाडिकांनी डिवचले

Amal Mahadik News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा एकदा कोल्हापूरचे राजकारण तापले आहे.
Amal Mahadik, Satej Patil News
Amal Mahadik, Satej Patil NewsSarkarnama

Kolhapur News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा एकदा कोल्हापूरचे राजकारण तापले आहे. कारखान्याच्या १ हजार २७२ सभासदांचे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी सभासदत्व रद्द केल्यानंतर माजी आमदार आणि राजाराम कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी काँग्रेस (Congress) नेते माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर टीका केली.

कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य होणार नाही. सतेज पाटलांना चार महिन्यापूर्वी 21-0 ने झालेला पराभव अजूनही पचवता आला नसल्याचा टोला, अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी लगावला.

Amal Mahadik, Satej Patil News
Eknath Shinde News : २०२४ च्या लोकसभेची हंडी मोदीच फोडतील ; मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या सभासदांना न्याय देऊन फेरतपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर यांना दिलेले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्याविषयी काय तक्रार आहे व त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडली आहेत. तसेच स्क्रुटिनी रिपोर्ट उपलब्ध करून देण्याविषयी निर्देशही दिले होते. मात्र, कोणतीही कागदपत्रे त्या सभासदांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. तसेच रितसर कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही.

त्यांचे म्हणणे आणि कागदपत्रांची कायदेशीर छाननी प्रादेशिक सहसंचालकानी केलेली नाही, असा आरोप महाडिक यांनी केला. प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर आदेश दिला, असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

Amal Mahadik, Satej Patil News
Pankaja Mundes Regret : अनेकांच्या अडचणी मार्गी लावल्या, पण माझ्या कारखान्याची अडचण सोडवली नाही; पंकजांच्या मनातील खदखद अखेर बाहेर

प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता दिलेल्या या आदेशाविरोधात त्यांच्या विरुध्द सभासदांकडून आम्ही अवमान याचिका देखील दाखल करणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली वक्तव्य बालिशपणाची आहेत, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीशी काडीचा संबंध नसताना कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात ते सभासदांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याच पुरता मर्यादित असून, त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काहीतरी करून दाखवतो आहे. असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल महाडिक यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com