Jawali NCP News : अजितदादांच्या गटाचे अमित कदम देणार शिवेंद्रराजेंना आव्हान...

Amit Kadam अजितदादा यांनी मला नेहमी संधी दिलेली आहे. जिल्हा परिषदेसाठी तिकिट देण्यापासून शिक्षण सभापतीपद मिळण्यासाठी सहकार्य केले आहे, असे अमित कदम यांनी म्हटलं आहे
Amit Kadam, Shivendraraje Bhosale
Amit Kadam, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on: 
Updated on: 

Jawali NCP News : जावळी तालुका आजपर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असून येथून आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे युवा नेते अमित कदम हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. विद्यमान भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आगामी निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी श्री. कदम यांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सातारा, जावळी विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, अशी मागणी करुन जनतेने संधी दिली तर निवडणूक लढवून जिंकून दाखवू, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला आहे.

मेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमित कदम Amit Kadam बोलत होते. यावेळी योगेश गोळे, प्रकाश कोकरे, सुरेश पार्टे, सुरेश दळवी, रवि शेलार, साधू चिकणे, प्रकाश कदम आदी उपस्थित होते. राज्य पातळीवर काहीही निर्णय झाला तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, तसेच विधानसभेसह सर्वच निवडणूका आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांना विचारात घेवून आम्ही ताकदीने लढणार असल्याचे अमित कदम यांनी जाहीर केले.

अमित कदम म्हणाले, दहा वर्षे जावलीत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून शशिकांत शिंदे यांनी काम पाहिले. त्यानंतर विद्यमान आमदार हे सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच होते राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फेच लढले आहेत. जावली हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून इथला राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ताही मनापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडावा. आगामी विधानसभेसाठी येथील स्थानिक नेतृत्वालाच संधी मिळावी, यासाठी आमचा आग्रह राहील.

आगामी काळात राज्यात काहीही तडजोडी झाल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी पक्ष स्वबळावर लढतो. नगरपालिका, जिल्हा परिषद आदी निवडणूका स्वबळावर लढवण्यासंदर्भात आमचा स्थानिक पातळीवरचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जरुर कळवला जाईल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला नेहमी संधी दिलेली आहे. जिल्हा परिषदेसाठी तिकिट देण्यापासून शिक्षण सभापतीपद मिळण्यासाठी सहकार्य केले आहे.

Amit Kadam, Shivendraraje Bhosale
Satara NCP News : शरद पवारांची साथ सोडून मकरंद पाटील अजितदादा गटात...

जावलीत बोंडारवाडी धरण,महू- हातगेघर धरण असे अनेक प्रश्न आहेत ते सोडवणेसाठी अजितदादांसोबत , सक्षम नेतृत्व असलेने त्यांचे सोबत राहणेचा निर्णय घेत आहे. हे सर्व प्रश्न सोडविणेचा आज अखेर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करूनही प्रश्न सुटले नाहीत . हे धरण होवू नये म्हणून कोणीतरी श्रेयवादासाठी खोडा घालत आहे. असेही अमित कदम म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.