Raj Thackeray At Gopinath Gad: मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोपीनाथ गडावर नतमस्तक

Raj Thackeray News : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले
Raj Thackeray at parali
Raj Thackeray at paraliSarkarnama

परळी वैजनाथ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

राज ठाकरे हे बुधवारी (ता.१८) न्यायालयीन कामानिमित्त बीडला(Beed) आले होते. मुंबईहून हेलिकॉप्टरने सकाळी १०:३० वाजता गोपीनाथ गडावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून उतरताच सर्वात आधी त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे(Gopinath Munde) यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

Raj Thackeray at parali
Congress News: भारत जोडोनंतर कॉंग्रेसचे लक्ष्य ‘हाथ से हाथ जोडो’, सहभागी नसलेल्यांची पदे काढणार !

यावेळी 'अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब, अमर रहे' अशा घोषणांनी गडाचा परिसर दुमदुमून गेला होता. तर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्ये या ठिकाणी उपस्थित होते.

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी परळी कोर्टात आज हजेरी लावली. त्यानंतर त्यांचे परळी कोर्टाने अटक वॉरंट रद्द केले. तसेच राज ठाकरे यांना कोर्टाने 500 रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयीन काम संपल्यानंतर त्यांनी काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत.

Raj Thackeray at parali
Pune G20 News: जी २० च्या प्रतिनिधींनी पुण्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेसह ऐतिहासीक वारसास्थळांना दिल्या भेटी

चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेकी प्रकरणी सतत गैरहजर राहिल्याने परळी कोर्टाने ठाकरेंना अटक वॉरंट बजावले होते. त्यामुळे ते आज जामीन घेण्यासाठी कोर्टात हजर झाले होते.

२००८ मध्ये मध्ये राज‎ ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎

Raj Thackeray at parali
Girish Bapat: डिस्चार्ज मिळताच खासदार बापटांनी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गाठला थेट कट्टा...

पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. परंतु काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. मात्र, आज ते परळी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचे अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com