Ambedkar VS Dhobale : 'मातंग समाजातील किती तरुणांना नोकरी...', लक्ष्मण ढोबळेंवर आंबेडकरांचा प्रहार

Reservation sub-categorization Controversy Anandraj Ambedkar Laxman Dhobale : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्यावरून आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यामध्ये वाद झाला आहे.
Anandraj Ambedkar Laxman Dhobal
Anandraj Ambedkar Laxman Dhobalsarkarnama
Published on
Updated on

विश्वभूषण लिमये

Anandraj Ambedkar News : अनुसूचित जातीमधील वर्गीकरणावरून महाराष्ट्रातील राजकारणात वाद प्रतिवाद होत आहेत. एका टिव्ही शोमध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर आनंदराज आंबेडकर यांनी सोलापूरमधील झालेल्या कार्यक्रमात ढोबळेंवर निशाणा साधला.

'तुम्ही जेवढ्या शैक्षणिक संस्था काढल्या त्यामध्ये तुम्ही किती मातंग मुलांना मोफत शिक्षण दिले आहे? समाजाचा किती उद्धार केला आहे आणि स्वतः चा किती उद्धार केला आहे, याचा फक्त जाब मातंग समाजातील तरुणांना द्या.', असे आव्हान आंबेडकर यांनी ढोबळेंना केले.

'मी त्यांच्यावर (ढोबळे) आरोप केले आणि त्यांच्या कुठल्या केसेस काढल्या तर काय परिस्थिती होईल ? मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे, कोणाच्या पर्सनल गोष्टींवर जात नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी इतके वर्ष सत्ता भोगली आणि आत्ता परत दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांच्या टीमकीवर नाचतायेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.', असे देखील ते म्हणाले.

Anandraj Ambedkar Laxman Dhobal
Maharashtra flood relief : फडणवीस सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरच पूरभार, प्रतिटन 15 रुपयांची कपात केली जाणार

'फक्त त्यांना विचारा नागपूरला त्यांच्याच समाजाच्या लोकांनी त्यांची काय परिस्थिती केली होती. तुम्ही समाजाचे नेतृत्व करण्यासाठी किती सक्षम आहात? आज आमच्या बरोबर मातंग समाजातील अनेक तरुण आंबेडकरी विचाराने प्रभावित होऊन बौद्ध धम्म स्वीकारला आहे.शिक्षण घेऊन व्हाईट कॉलर जॉब करतायेत.अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचे रोटीबेटी व्यवहार ही होत आहेत.', असे देखील ते म्हणाले.

डाव सफल होऊ देणार नाही...

आंबेडकर म्हणाले, बौद्ध आणि मातंग समाजामध्ये काही लोकं विष कालवू पाहतायेत,पण आंबेडकरी समाज आणि सुशिक्षित मातंग समाज हा त्यांचा उद्देश सफल होऊ देणार नाहीत, अशी मला आशा आहे. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा सत्तेपासून कायमचा वंचित राहू नये म्हणून रिपब्लिकन सेनेत येण्याचं आवाहन मी करत आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

Anandraj Ambedkar Laxman Dhobal
Narendra Modi Address Nation : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार, संघाच्या शताब्दी कार्यक्रमात होणार सहभागी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com