Amrita Fadnavis blackmail case : अमृता फडणवीस धमकी प्रकरण; अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Aniksha Jaisinghani News : अनिक्षा जयसिंघानीवर अमृता फडणवीसांना धमकी दिल्याचा आरोप आहे.
Amrita Fadnavis blackmail case
Amrita Fadnavis blackmail caseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी प्रकरणात अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अनिक्षा जयसिंघानीवर अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याचा आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.

आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिक्षा जयसिंगानीला जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासात सहकार्य करण्यासाठी अटीशर्ती कोर्टाने अनिक्षाला घातल्या आहेत.

Amrita Fadnavis blackmail case
Parinay Fuke News : वाळुमुळे अडलेली घरकुले आता होतील पूर्ण, परिणय फुकेंचा पाठपुरावा !

काय आहे प्रकरण?

डिझायनर अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकी दिली असल्याची तक्रार अमृता फडणवीसांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

यानंतर अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर आज न्यायालयाने अनिक्षाला जामीन मंजूर केला आहे.

Amrita Fadnavis blackmail case
Abhimanyu Pawar News : `कैसे हो अभिमन्यू`, अमित शहांकडून विचारपूस कशाचे संकेत ?

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच दिल्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याच्या आरोपानंतर राज्याच राजकारण चांगलच तापलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com