अण्णांची प्रकृती ठणठणीत : रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) हे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलला गेले आहेत.
anna hazare
anna hazaresarkarnama
Published on
Updated on

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलला गेले आहेत. यावरून सोशल मीडियात अफवा सुरू झाल्या आहेत. अण्णा हजारेंची प्रकृत्ती ठणठणीत असून ते उद्या ( शुक्रवारी ) सायंकाळी राळेगणसिद्धीत परत येणार आहेत, असे अण्णा हजारे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. Anna's health is cool: Ruby hospital for routine checkups ...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. हजारे हे काल ( बुधवारी ) दिवसभर कार्यकर्त्यांसमवेत शिबिरात होते. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनही केले. त्यांचे दैनंदिन कामकाजही सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोनामुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अण्णांना रुबी हॉल येथे दाखल झाले आहेत, अशी माहिती हजारे यांचे स्वीय सहाय्यक संजय पठाडे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

anna hazare
अण्णा हजारे म्हणाले, हा विजय विरोधकांचा नसून शेतकऱ्यांचा...

ते पुढे म्हणाले की, डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी अण्णांच्या प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील होणाऱ्या तपासण्या रुबी हॉलला कराव्यात अशी सूचना केली होती. त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल येथे आणण्यात आले आहे. आज दिवसभरात झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला तरी वयानूरूप काळजी म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून तेही सर्व अहवाल अगदी साधारण आहेत. यावेळी सरपंच लाभेष औटी, श्याम पठाडे, संदीप पठारे आदी हजारे यांच्या सोबत उपस्थित आहेत.

anna hazare
अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत...

विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबणार असून उर्वरित तपासण्या सकाळी करून अण्णा पुन्हा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी काळजी करू नये.

- संजय पठाडे, स्वीय सहाय्यक अण्णा हजारे

अण्णांना त्यांच्या तपासण्या करण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल येथे आणण्यात आले होते. सर्व तपासण्या एका दिवसांत पूर्ण होत नसल्याने एक दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावे लागत आहे. तसेच त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असून उद्या अण्णा परत राळेगणसिद्धीला येतील. तसेच अण्णांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी कोणत्याही चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवू नये.

- लाभेष औटी, सरपंच राळेगणसिद्धी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com