File Photo Of Bribe
File Photo Of BribeSarkarnama

ACB News : सहकारी डाँक्टराकडून लाच स्वीकारताना महिला वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

Dr.Vrishali Suryavanshi News : डॉ. वृषाली तुळशीराम कोरडे (वय ३९ रा. राहुरी) यांनी आपल्याच विभागात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरकडे लाचेची मागणी केली होती.

Rahuri News : आपल्या महिला सहकाऱ्याकडून लाच मागणाऱ्या एका महिला आरोग्य अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई (एसीबी) केली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक हरिष खेडकर, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे यांच्या पथकाने रंगेहाथ पैसे स्विकारताना कारवाई केली.

File Photo Of Bribe
Congress : काँग्रेस डेंजर झोनमध्ये ; निष्ठावंत नेता का दुखावला जातो ?

डॉ.वृषाली सुर्यवंशी (कोरडे) असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.

ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन मिळण्यासाठी तक्रारदार महिला डाँक्टरकडून त्यांनी लाच मागितली होती. त्यांना एसीबीने (ACB)सापळा रचून पकडले.

File Photo Of Bribe
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका अमेरिकेतही ; टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले बॅनर

डॉ. वृषाली तुळशीराम कोरडे (वय ३९ रा. राहुरी) यांनी आपल्याच विभागात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरकडे लाचेची मागणी केली होती. ६ फेब्रुवारीला लाच मागणी पडताळणीमध्ये १० हजार मागणी केल्याचे तपासात आढळले आहे. ता. ८ रोजी बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य येथे तक्रारदार यांच्याकडून महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी रोख स्वरूपात लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांनी मिळणाऱ्या रकमेतून निम्मी रक्कम मला मिळावी अशी मागणी केली होती. पैसे मागणी झाल्यानंतर दुसऱ्या भेटीत पुन्हा डॉ. सुर्यवंशी यांनी तू काही तरी रक्कम दे तरच मी तुझ्या बिलासंबंधी पुढील प्रक्रिया करेन असे सांगितल्याने तक्रारदार यांनी ४ हजार ५० रूपयांची रक्कम अदा केली. दुसर्‍या भेटीत पुन्हा डॉ.सुर्यवंशी यांनी तू काही तरी रक्कम दे, तरच मी तुझ्या बिलासंबंधी पुढील प्रक्रिया करेल. रक्कमेची तडजोड होऊन १० हजार तरी द्यावे, असे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com