APMC Election : पलूस बाजार समिती अखेर बिनविरोध; काँग्रेस, राष्ट्रवादी अन भाजपची समन्वयाची भूमिका !

Market Committee Election : स्वाभिमानी शेतकरी संघटना व पलूस शहर स्वाभिमानी आघाडीला प्रत्येकी १ जागा
APMC Election : Vishwajit Kadam
APMC Election : Vishwajit KadamSarkarnama
Published on
Updated on

Sangali (Palus) News : पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे अंतिम क्षणी बिनविरोध झाली आहे. एकूण १८ जागांपैकी सत्ताधारी काँग्रेसला १०, भाजपा व राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीला प्रत्येकी १ जागा देण्यात आली आहे. पलूस बाजार समितीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे.

APMC Election : Vishwajit Kadam
Pandharpur Bazar Samiti : पंढरपुरात मोठा ट्विस्ट : भालके-काळेंची माघार; परिचारकांना अभिजित पाटलांचे आव्हान

पलूस बाजार समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. गेल्या वेळेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्थात अंतिम क्षणापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व स्वाभिमानी शेतकरी संघटना, पलूस शहर स्वाभिमानी आघाडी यांच्यामध्ये चर्चेचे गुर्हाळ सुरू होते.

विरोधकांची जास्त जागांची अपेक्षा होती. तर काँग्रेस (Congress) गेल्यावेळीप्रमाणे तडजोडीस तयार होती. मात्र, एकमत होत नव्हते. अर्ज माघारीची मुदत संपत आली तरी, निर्णय होत नव्हता. निवडणूक लागणारच, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

APMC Election : Vishwajit Kadam
Maratha Reservation : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!

अखेर सर्व पक्ष व संघटनांचे नेते, कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली. सत्ताधारी काँग्रेस पक्षास १०, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ३ तर, स्वाभिमानी शेतकरी संघटना व पलूस शहर स्वाभिमानी आघाडीला प्रत्येकी १ जागा देण्याचे सर्वमान्य करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, किरण लाड, जि.प.चे माजी सदस्य शरद लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तम पवार, सर्जेराव पवार, वैभव पुदाले, सुरेंद्र चौगुले, संदिप राजोबा, निलेश येसुगडे, विजय पाटील, प्रकाश मांगलेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com