Pandharpur Bazar Samiti : पंढरपुरात मोठा ट्विस्ट : भालके-काळेंची माघार; परिचारकांना अभिजित पाटलांचे आव्हान

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मात्र परिचारक गटाच्या विरोधात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणूक लागली आहे.
 Pandharpur Bazaar Samiti Election
Pandharpur Bazaar Samiti ElectionSarkarnama

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazaar Samiti) निवडणुकीमध्ये (Election) सत्ताधारी माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) गटाच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरीत १३ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Applications of 35 candidates for 13 seats of Pandharpur Bazaar Samiti)

या निवडणुकीतुन राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे आणि भगिरथ भालके यांच्या गटाने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणुकीतील हवाच निघून गेली आहे. मात्र, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मात्र परिचारक गटाच्या विरोधात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणूक लागली आहे.

 Pandharpur Bazaar Samiti Election
Bazar Samati Election : जुन्नरमध्ये महाआघाडीत बिघाडी : काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; ठाकरे गट भाजप-शिंदे गटासोबत

पंढरपूर बाजार समितीवर मागील २५ वर्षांपासून परिचारक गटाची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत अभिजीत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याने बाजार समितीची निवडणूक लागली आहे. मात्र, काळे आणि भालके यांच्या माघारीची मात्र चर्चा रंगली आहे.

पंढरपूर बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सुरुवातीपासूनच लवचिक भूमिका ठेवली होती. त्यासाठी त्यांनी विरोधकांना आवाहन करत काही जागा देण्याची तयारी दर्शविली होती. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासून वेगवान हालचाली घडत गेल्या.

 Pandharpur Bazaar Samiti Election
Bazar Samiti Election : इंदापुरात आप्पासाहेब जगदाळे-दत्तात्रेय भरणेंची पुन्हा युती : चौघे बिनविरोध; १४ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात

आज सकाळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांच्यासोबत बैठक झाली. त्यात बाजार समिती बिनविरोध करण्यावरच चर्चा झाली. त्या बैठकीनंतर विठ्ठल परिवाराची एक बैठक झाली. त्या बैठकीत भालके, काळे यांच्यासोबत अभिजित पाटीलही सहभागी झाले होते. मात्र, बिनविरोधवर एकमत होऊ शकले नाही.

दरम्यान, प्रशांत परिचारक गटाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ते सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती आणि व्यापारी मतदारसंघातील दोघांचा समावेश आहे.

 Pandharpur Bazaar Samiti Election
Ambegaon News : मोठी बातमी : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकमांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली; निकम लढण्यावर ठाम

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

1) नागनाथ मोहिते (सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग)

2) वसंत चंदनशिवे ( ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती )

3) शिवदास वामन ताड (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक)

व्यापारी मतदार संघ

१) यासीन अजीज बागवान

२) सोमनाथ सदाशिव डोंब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com