Youth Congress : श्रीरामपूर युवक काँग्रेसच्या नियुक्त्यांवर वरिष्ठांकडून शिक्कामोर्तब

वरिष्ठांच्या परवानगीने व स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रसिद्ध करण ससाणे ( Karan Sasane ) गटाने कुरघोडी केली आहे.
Youth Congress
Youth CongressSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

Youth Congress : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी श्रीरामपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या केलेल्या निवडीला जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी स्थगिती दिली होती. यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने व स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रसिद्ध करण ससाणे ( Karan Sasane ) गटाने कुरघोडी केली आहे.

ओगले यांनी श्रीरामपूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रितेश चव्हाणके व उपाध्यक्षपदी शाहरुख शेख यांची नियुक्ती केली होती. ही पत्रे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. या निवडीमुळे तत्कालीन अध्यक्ष अभिजीत लिपटे यांची या पदावरून गच्छंती झाली होती.

Youth Congress
युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांनी केलेल्या निवडीला जिल्हाध्यक्षांचे आव्हान

त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांच्याद्वारे नवीन नियुक्त्यांना स्थगिती मिळवली होती. ही दोन्ही पत्रे सोशल मीडियात व्हायरल होताच काँग्रेस अंतर्गत नव्याने वाद उफाळून आला होता. यानंतर ओगले यांनी वरिष्ठांची संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रावर उत्तर महाराष्ट्र प्रभारी वंदनाबेन यांची स्वाक्षरी नव्हती. यासंदर्भात 'सरकारनामा'ने सर्व प्रथम वृत्त प्रसिद्ध केले.

Youth Congress
श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे आले एकत्र

दरम्यान, ओगले यांनी वरिष्ठांची संपर्क साधत या दोन्ही निवडींना महाराष्ट्र युवक काँगेसचे प्रभारी मितेंद्र सिंग, उत्तर महाराष्ट्र प्रभारी वंदना बेन व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या स्वाक्षरीने काल ( ता. 28 ) उशिरा नवे नियुक्तीपत्रे काढण्यात आली. यामुळे ओगले यांनी केलेल्या निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. या नवनियुक्तीने ससाणे गटाने कानडे गटावर कुरघोडी केल्याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com