अहमदनगर - जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्ष अविनाश निंभोरे व उपाध्यक्ष गंगाराम गोडे यानी यांनी शनिवार (ता. २६)ला आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहे. यामुळे जिल्ह्यात वेगळीच चर्चा सुरु झालेली आहे. ( As a result, the city's District Primary Teachers Bank is again a topic of discussion )
जिल्हा प्रथामिक शिक्षक बॅंकेतील संचालक मंडळाला अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची संधी कोरोनामुळे चालून आलेली आहे. त्यामुळे बॅंकेतील अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडी सहा महिन्याला होत होत्या. मात्र आता त्या तीन महिन्याला होऊ लागलेल्या आहेत. यावरून संचालक मंडळाच्या या कारभावर सभासदांमधून नाराजी व्यक्त केलेली आहे. (Shikshak Bank Ahmednagar News)
सभासद हिताचे काम करण्याऐवजी संचालक सध्या एकमेकांना अध्यक्ष व उपाध्यक्ष करून आपला मोठे पणा करून घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप सभासदांमधून केला जात आहे. सध्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी काम करून दिले जात नसल्यामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे, याबाबत स्पष्ट होऊ शकले नाही.
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत आपले राजीनामे दिलेले आहेत. संचालक मंडळाने ते मंजूर केलेले असून सोमवार (ता. 28)ला राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविले जाणार आहेत.
यातून होणार अध्यक्ष व उपाध्यक्ष
कोरोनामुळे बॅंकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याचा फायदा मंडळांना झालेला आहे. संचालक मंडळातील अनेकांना अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची संधी मिळालेली आहे.
बॅंकच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत जी कामांची बिले मंजूर करण्यात आलेली आहे. ती मंजूर करू नये.
- सलीमखान पठाण, संचालक, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.