मीही कोरोना सेंटर काढले होते पण कधी प्रसिद्धी केली नाही

मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका केली.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे आज शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे व त्यांच्या पत्नी स्मिता शिरोळे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ), विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका केली. ( I also removed the Corona Center but never made it public )

गुलाबराव पाटील म्हणाले, मी निवडणुका जिंकणे व हारणे याला फारसे महत्त्व देत नाही. मात्र कार्यकर्ता जिवंत असण्याला महत्त्व देतो. मी 2009ला दोन हजार मतांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो. पराभूत झाल्यावर लोक मला येऊन भेटत होते. मला वाटायचं मी एवढी कामे केली मला कोण पाडू शकतो. मी पराभूत झाल्यावर 11 व्या दिवशी जनतेची आभार सभा घेतली. या आभार सभेला 25 हजार लोक होते. आमदार जो पर्यंत आपला असतो तो पर्यंत कार्यकर्त्यांना किंमत नसते. जेव्हा आमदार पडतो तेव्हा त्याची किंमत कळते. मी पाच वर्षे प्रयत्न समोरचा 11 खात्यांचा मंत्री असूनही मी त्याला पराभूत केलं. औटी साहेब तुम्ही पडलेले नाहीतच, मीही त्यावेळी पडलो नव्हतो. पराभवाला कारण आपल्यातीलच काही शुक्राचार्य होते, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

Gulabrao Patil
पाणी देण्याची जबाबदारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली..

ते पुढे म्हणाले, आपल्यातलेच काही अशे असतात की ग्रामपंचायत सदस्य झाले लगेच सरपंच नंतर लगेच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य होत आमदारकीच तिकीट मागतात. मी मंत्री व्हायला 35 वर्षे लागली. किती उन, सावल्या गेल्या माहिती नाही. छगन भूजबळ, नारायण राणे, राज ठाकरे पक्षातून जाताना पाहिले. मात्र मनात कधी पक्ष सोडण्याचा विचार आला नाही. त्याचीच फलश्रुती म्हणून माझ्या सारखा सामान्य कुटुंबातील माणूस मंत्री झाला.

औटी साहेब तुम्हा का पडले हे शोधण्यासाठी जरा कार्यकर्त्यांचे ब्लडग्रुप तपासा. चहा पेक्षा किटली गरम आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही भोळेपणाने राजकारण केले ते चालत नाही. मी पण पडल्यावर मला अनुभव आला.

Gulabrao Patil
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

कोरोना काळात शिवसेनेने सर्वांत जास्त मैदानात उतरून सर्वसामान्यांसाठी काम केले. कोरोना सेंटर काढली. मीही कोरोना सेंटर काढले होते मात्र मी कधी प्रसिद्धी केली नाही. माझं बघं माझं बघं म्हणायची काही गरज नाही. मी माझं स्वतः हॉस्पिटल चालवलं. माझ्या मुलाने हॉस्पिटलमध्ये देखरेख केली. सेवा करायची असते सांगायची नसते. दान करायच असत बोलायच नसतं, अशी टीकाही त्यांनी आमदार लंके यांचे नाव न घेता केली.

Gulabrao Patil
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

ठिक आहे, प्रत्येकाची स्टाईल आहे. औटी साहेब तिथे तर तुम्ही कमी पडले. आपले जे 80 टक्के सेवा हे ब्रिद आहे. त्यावर काम करा. सत्तेचे परक्युलेशन झालं पाहिजे. विजय औटी एकटे नाहीत. त्यांचा हा लहान भाऊ त्यांच्या पाठीशी आहे. ते एक अभ्यासू माणूस आहेत. विधानसभेत त्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले. मात्र त्यांना कोणाच्या खांद्यावर हात ठेवणं जमत नाही. त्यांना खोट वागण जमत नाही. त्यामुळे लोक म्हणतात ते कडक आहेत. त्यांनी काळानूसार थोड बदलायला हवं पण ते बदलणार नाहीत. कारण ते तत्त्वनिष्ठ माणूस आहेत. अभ्यासू माणूस आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com