Mohite Patil : विजयदादा भाजपत असेपर्यंत त्यांचा लक्ष्मण म्हणून काम करेन : सुभाष पाटलांनी गायले मोहिते पाटलांचे गोडवे

विजयदादांचे काम मोठे आहे. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील १४ गावांना विजयदादांमुळेच उजनीचे पाणी मिळाले आहे.
Subhash Patil
Subhash PatilSarkarnama
Published on
Updated on

नातेपुते (जि. सोलापूर) : विजयदादा (Mohite Patil) जोपर्यंत भाजपमध्ये आहेत, तोपर्यंत मी त्यांचा लक्ष्मण म्हणून आणि मोहिते पाटील बंधूंचा हनुमान सेवक म्हणून काम करणार आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मोहिते-पाटील घराणे भाजपमध्ये (BJP) आहे तोपर्यंत मी त्यांचा सेवक म्हणूनच राहील, अशा शब्दांत एकेकाळचे कट्टर विरोधक सुभाष पाटील (Subhash Patil) यांनी मोहिते पाटलांचे गोडवे गायले. (As long as Vijaydada is in BJP, I will work as his Laxman: Subhash Patil)

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात १९९०, १९९५ आणि १९९९ या तीन विधानसभा निवडणुका लढविणारे सुभाष पाटील यांनी सोमवारी (ता. १२ डिसेंबर) रात्री राजकीय शुत्रत्व संपवत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बोलताना सुभाष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Subhash Patil
Solapur News : मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाचा विजयदादांच्या उपस्थितीतच भाजपत प्रवेश

पाटील म्हणाले की, आमच्या समाजाने १९५२ पासून विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. मुख्य प्रवाहात नसल्यामुळे आमच्या समाजाची मोठी फरपट होत आहे. विजयदादांचे काम मोठे आहे. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील १४ गावांना विजयदादांमुळेच उजनीचे पाणी मिळाले आहे. संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. मोहिते-पाटील घराणे भाजपमध्ये आहे; तोपर्यंत मी त्यांचा सेवक म्हणूनच राहील. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मात्र, पक्षाने काही जबाबदारी दिली तर त्याचे मी सोने करील.

Subhash Patil
Walse Patil : वळसे पाटलांच्या पुतण्याला शरद पवारांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला!

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, ‘सुभाष अण्णा पाटील यांनी कधीही आमचा व्देष केला नाही. दादासाहेब (विजयसिंह मोहिते पाटील) व सुभाष पाटील यांचे राजकारण सुसंस्कृत होते. राजकीय मतभेद होते, मनभेद नव्हते. आगामी काळात त्यांना संपूर्ण मदत करणार.

Subhash Patil
BJP News : भाजपला मोठा हादरा : खाणसम्राट रेड्डींकडून नव्या पक्षाची घोषणा; मतविभागणीचा फटका बसणार

अध्यक्षीय भाषणात के. के. पाटील म्हणाले की, सुभाष अण्णा पाटील यांनी सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आयुष्यभर तन-मन-धन अर्पण करून काम केले आहे. त्यांनी कधीही कार्यकर्त्यांच्या खिशाला झळ लागू दिली नाही. आज भाजप राज्यात आणि देशात सत्तेवर असताना अण्णा मात्र आमच्या जवळ नाहीत, याची आम्हाला खंत होती. आज अण्णा भाजपमध्ये आल्यामुळे खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. विजयदादा आणि सुभाष पाटील हे एकाच मंचावर एकाच पक्षात असल्यामुळे आजचा दिवस अलौकिक आणि अविस्मरणीय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com