

राहुल गडकर
Kolhapur Politics : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात येणार आहेत. पण ही वाघनखे भारतात येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघनखे ओरिजनल आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल राज्यकर्त्यांना करत त्यावर आक्षेप घेतला आहे.
पण, आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मृतिचिन्ह कोणतेही असो त्याचे शिवप्रेमी निश्चितच स्वागत करणार आहेत. तलवार आणि वाघनखे दोन्ही आणणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याचे स्वागत करेल, असं मंडलिक यांनी म्हटलं आहे. पण आदित्य ठाकरे या वाघनखांबद्दल काय म्हणाले? या वादात मला पडायचे नाही. कदाचित आदित्य ठाकरेंनी स्वतःचीच नखे वाघनखे वाटत असतील, असा टोलाही मंडलिक यांनी लगावला आहे.
मुश्रीफ यांना ओरिजनल वाघनखे आणण्याची खात्री
तर आदित्य ठाकरेंना वाघनख्यांबाबत काय कळतंय? हे मला माहिती नाही. पण आमचं महायुतीचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरून आणणार आहेत. याचा आनंद मला आहे. ती वाघनखे कोल्हापुरात ठेवली जातील. याचा आनंद सर्वात मोठा आहे. सुधीर मुनगंटीवार हे इतिहास जाणून घेतल्याशिवाय असे पाऊल उचलणार नाहीत. महाराजांनी वापरलेलीच वाघनखे आणली जातील. याची मला खात्री आहे, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाराजांच्या भवानी तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं राज्यात येणार आहेत, पण ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात येतील, त्यानंतर ती पुन्हा लंडनला पाठवली जाणार असल्याचे मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.