Karad : सरपंचाचं लग्न ठरेना; मग काय, थेट केंद्रीय मंत्र्यांनाच घातले साकडे

Atul Bhosale : अजय मिश्रा हे कराड दौऱ्यावर असताना हा किस्सा घडला
Ajay Mishra
Ajay MishraSarkarnama

कराड : तरुण सरपंचाचे राजकारणात असल्यामुळे लग्न ठरेना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना यात तुम्हीच लक्ष घाला, अस मिश्कील साकडं भाजपा (BJP) नेते अतुल भोसले यांनी घातलं. अजय मिश्रा हे कराड तालुक्यातील येवती दौऱ्यावर असताना हा किस्सा घडला.

Ajay Mishra
Bjp News: '' आता हरायचंच न्हाय!''; भाजपच्या जेपी नड्डांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले

कराड तालुक्यातील येवती गावचे सरपंच सागर शेवाळे यांनी गावच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याने केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून निधी मंजूर करून आणला आहे. सरपंच झाल्यानंतर त्याच्या लग्नासाठी वधू पाहण्यास सुरू झाले.

Ajay Mishra
Shiv Sena : खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर आज होणार फैसला

मात्र, राजकारणात असल्याने मुली त्यांच्याशी लग्न करण्यासाठी नकार देत आहेत, हा किस्सा केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा येवती दौऱ्यावर आल्यानंतर डॉ. अतुल भोसले यांनी भाषणात सांगितला आणि आता थेट मिश्रा यांनाच लक्ष घालावे, असं साकडं घातलं. यामुळे या कार्यक्रमात एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com