राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्यावर प्राणघातक हल्ला; राऊतांची उच्च न्यायालयातून माघार

या प्रकरणात सुनावणीवेळी पोलिस अधिकारी आरोपींच्या बाजूने वागल्याने न्यायमूर्तींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
NCP Former Group Leader News
NCP Former Group Leader NewsSarkarnama
Published on
Updated on

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी (Barshi) नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी गटनेते  नागेश  अक्कलकोटे प्राणघातक हल्लाप्रकरणी माजी नगरसेवक विजय राऊत यांच्यासह तीन जणांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज माघार घेतला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अर्ज निकाली काढला, अशी माहिती ॲड. विकास जाधव यांनी माहिती दिली. (Assault on former Group leader of NCP; Raut's withdrawal from the High Court)

 दरम्यान, या प्रकरणात सुनावणीवेळी पोलिस अधिकारी आरोपींच्या बाजूने वागल्याने न्यायमूर्तींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, राऊत यांच्या अटकेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास इच्छूक नसल्याचेही न्यायाधीशांनी सूचित केले. पत्रकार परिषद घेऊन ॲड जाधव यांनी याबाबतची सविस्तर हकीकत सांगितली. या वेळी माजी मंत्री दिलीप सोपल, सुधीर सोपल , नागेश अक्कलकोटे उपस्थित होते.

NCP Former Group Leader News
अभिजीत पाटलांच्या कारखान्यांसह घरावर दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची कारवाई

आरोपींना जामीन अर्जावर तपशीलवार आदेश हवा आहे की त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्यायचा आहे का, असा सवाल न्यायालयाने आरोपीच्या वकिलांना विचारला. तेव्हा आरोपीचे वकिल ॲड. मुंदर्गी यांनी आरोपींकडून जामीनासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर उच्च न्यायलयाने तो जामीन अर्ज निकाली काढला.

NCP Former Group Leader News
पाशा पटेल यांच्यावर दुःखाचा डोंगर; मुलाचे अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

राष्ट्रवादीचे बार्शी नगरपालिकेतील गटनेते अक्कलकोटे यांच्यावर १ ऑगस्ट २०१४ रोजी  प्राणघातक हल्ला झाला होता. त्या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत विजय राऊत, दीपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दीपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

NCP Former Group Leader News
शिंदेसाहेब, तुम्ही गुवाहाटीला गेला, त्यावेळी मी पहिले समर्थन केले; आता आमचा आवाज का दाबता?

पोलिस निरीक्षक चाऊस यांनी विजय राऊत, दीपक धावारे, रणजित चांदणे यांचे नाव वगळण्याचा अहवाल व इतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयाकडे सादर केले होते. अक्कलकोटे  यांच्या वतीने  ॲड.अभिजित कुलकर्णी, ॲड. विकास जाधव, ॲड. प्रशांत एडके यांनी काम पाहिले.

NCP Former Group Leader News
नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून केले पाचर्णे कुटुंबीयांचे सांत्वन; ‘जनतेसाठी उठणारा आवाज हरपला’

 दरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिकारी आरोपींच्या बाजूने वागल्याने न्यायमूर्तींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांच्या अटकेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास इच्छूक नसल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com