Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा लक्ष्य; बालेकिल्ल्यात सात जागांवर उमेदवार देणार?

Satara News :महाराष्ट्रात किमान 80 जागा लढण्याचा निर्धार पक्षाच्या वतीने केला जाणार आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यात पुन्हा राष्ट्रवादीची ताकद उभी करण्याचा प्रयत्न होणार आहे.
ajit pawar
ajit pawarsarkarnama

Satara News, 1 June : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी ( Assembly Election 2024 ) आतापासूनच तयारी आणि बांधणी सुरू केली आहे. संपूर्ण राज्यात किमान 80 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, महायुतीत सहभागी झाल्यानंतर सातारा लोकसभेवरील दावा सोडावा लागला होता.

त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने सातारा ( Satara ) जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद वाढविताना जिल्ह्यातील सात जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील नेत्यांसोबत लवकरच बैठक होणार आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या राष्ट्रवादीची ( Ncp ) नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी पक्षातील नेते व कार्यकर्ते यांना 'बाळकडू' दिले, तसेच लोकसभेच्या पराभवाने नाराज न होण्याच्या किंवा विजयाने हुरळून न जाण्याची सूचना त्यांनी केली आहे. तसेच आता विधानसभा निवडणूक हेच आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत सातारा लोकसभेवरील हक्क अजित पवारांना सोडावा लागला होता. त्याबदल्यात त्यांना राज्यसभेची एक जागा देण्याचा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी घेतला. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेची निवडणूक जास्तच गांभीर्याने घेण्याची भूमिका घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानुसार महाराष्ट्रात किमान 80 जागा लढण्याचा निर्धार पक्षाच्या वतीने केला जाणार आहे. सातारा जिल्हा आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यात पुन्हा राष्ट्रवादीची ताकद उभी करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी सातारा-जावळी, वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, माण, फलटण मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करून येथून उमेदवार देण्यासाठी आतापासूनच चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे, बैठकाही घेतल्या जाणार आहेत.

त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीतील हानी विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजितदादा गटाकडून होणार आहे. त्यासाठी सातारा बालेकिल्ल्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, अमित कदम, श्रीनिवास शिंदे, नंदकुमार मोरे आदींच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत.

ajit pawar
Ajit Pawar News : "लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत," अजित पवारांचं विधान

"महायुतीत सहभागी असल्याने कोणती जागा सोडायच्या कोणत्या जागेवर लढायचे याबाबत ज्या त्यावेळी निर्णय होणार आहे. त्यामुळे सर्वच जागांवर तयारी करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वच आठ विधानसभा मतदारसंघांत संघटन बांधणी आणि उमेदवार चाचपणी होणार आहे," अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी दिली.


( Edited By : Akshay Sabale )

ajit pawar
Ajit Pawar News : अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचीच माणसे अडचणीत का येत आहेत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com