Atrocity Act : आंतरजातीय प्रेमविवाहात अॅट्रोसिटी एन्ट्री; बायकोकडूनच नवऱ्याची पोलिसात तक्रार...

Atrocity Act : प्रेमविवाहानंतर पती पत्नीला जातीवरुन हिणवत होता, अपमानास्पद वागणूक देत होता.. पत्नीचा तक्रार
Atrocity Act :
Atrocity Act : Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याचे वादविवाद पोलिस स्थानकांपर्यंत पोहचल्यानंतर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद झाल्याची एक दुर्मिळ घटना घडली आहे. मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीवर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक असे गुन्हे केल्यानंतर मागासवर्गीय व्यक्तीकडून ॲट्राॅसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याची तरतूद आहे. परंतु एका महिलेने आपल्याच नव-यावर ॲट्राॕसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदविण्याचा अनोखा प्रकार पंढरपुरात घडला आहे.

न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नव-यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिली-वहिली घटना असल्याचे मानले जात आहे. पत्नीने पतीविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर पतीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पंढरपूरच्या शहरालगत एका वस्तीत हा प्रकार घडला. (Latest Marathi News)

Atrocity Act :
Chandrapur Crime News : कुलथा मारहाणप्रकरण; शिवसेनेच्या वाहतूक जिल्हा प्रमुख काशीकरवर गुन्हा दाखल!

आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवरा-बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोण चक्क ॲट्रोसिटी कायद्याखाली नव-याविरूध्द फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचले आहे. या अनोख्या खटल्याची माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी यांचा प्रेम विवाह झाला होता. फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील आहे.

वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या. परंतु अलिकडे काही दिवसांपासून नवऱ्याकडून आपणांस जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते आहे. नव-याने आपल्या इच्छेविरूध्द लैंगिक अत्याचारही केला, अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Atrocity Act :
Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात घुसखोर बांग्लादेशी,10 बनावट पासपोर्ट काढल्याचे उघड!

दरम्यान, आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली आहे, त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याने नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने ,ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड वैभव सुतार हे काम पाहत आहेत. नवर्‍याविरुद्ध बायकोने ॲट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com