Chandrapur Crime News : कुलथा मारहाणप्रकरण; शिवसेनेच्या वाहतूक जिल्हा प्रमुख काशीकरवर गुन्हा दाखल!

Chandrapur Crime News : प्रशासनाच्या आर्शीवादाने वाळू तस्करांना अभय दिल्या जात असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे.
Chandrapur Crime News
Chandrapur Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा वाळूघाटावर सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावर चाकूने व लोखंडी रॉडने मारहाण करण्याची घटना काल मध्यरात्री घडली होती. याप्रकरकणी गोंडपिपरी पोलीसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाहतूक विभागाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर यांच्यासह इतर दोघांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली, असून काशीकर हा फरार झाला आहे. (Latest Marathi News)

चंद्रपूर जिल्ह्यात वाळू तस्करांकडून अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वाळूला मोठी मागणी आहे. येथील कुलथा घाट हा अवैध वाळू तस्करांचा अड्डा बनला आहे. चंद्रपूरातील वाळू माफियांकडून या घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. बऱ्याच दिवसापासून हा प्रकार सुरू असतांना प्रशासनाचे याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या आर्शीवादाने वाळू तस्करांना अभय दिल्या जात असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. यातूनच गावकऱ्यांना दमदाटी करणे, धमकविणे असे प्रकार सर्रासपणे सुरू होते.

Chandrapur Crime News
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

गुरूवारी (ता. 28) रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील तारडा गावचे सरपंच तरूण उमरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर लखमापूरे व काही महिला पदाधिकारी कुलथा वाळूघाटावर पोहचले. त्यांनी वाळू तस्करी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तस्करांनी चाकूने व लोखंडी रॉडने सरपंच तरूण उमरे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रशेखर लखमापूरे व महिलांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गोंड पिंपरीच्या ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. पण त्यांची अवस्था लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.

हल्ला केल्यांनतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू हे घटनास्थळावर दाखल झाले. या प्रकरणात जखमींचे जबाब घेण्यात आले. याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे चंद्रपूर जिल्ह्याचे वाहतूक विभाग जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर यांच्यासह साहिद सयद, वैभव पेंडसे यांच्यावर कलम 307 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान काशीकर फरार असून साहिद सयद व वैभव पेंडसे यांना गोंडपिपरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Chandrapur Crime News
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

तारडा ग्रामपंचायतीचे सरंपच तरूण उमरे हे शिवसेना उबाठा गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती कळताच शिवसेनेच्या स्थानिक कार्यकत्र्यांनी प्रंचड संताप व्यक्त केला. स्वप्नील काशीकर यांच्यावर विविध प्रकरणात याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. मागील काळात काशीकर यांनी वनविभागाच्या अधिका-यांची बंदूक हिसकवून मारहाण केली होती. त्यावेळेस हा मु्द्दा चांगलाच गाजला होता. सरपंचावर रेतीतस्करांनी जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गोंडपिपरी तालुका सरपंच संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. संघटनेच्या पदाधिका-यांनी प्रशासनाला निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com