Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात घुसखोर बांग्लादेशी,10 बनावट पासपोर्ट काढल्याचे उघड!

Intruder Bangladeshi in Pune On Fake Passport : बनावट पासपोर्ट तयार करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट...
Bangladesh Passport
Bangladesh PassportSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरात बांग्लादेशी घुसखोरांची समस्या असल्याची नेहमीच दिसले आहे. मागील काही दिवसांत शहरात अनधिकृत पद्धतीन बांग्लादेशी घुसखोरांवर पोलिसांनी कारवाई केली होती. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून या बांग्लादेशच्या घुसखोरांनी चक्क १० पासपोर्ट बनवल्याचे आता उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)

Bangladesh Passport
Basanagouda yatnal: कोरोना भ्रष्टाचाराचा 'व्हायरस' भाजप आमदाराच्या अंगलट; पक्षश्रेष्ठी कारवाई करणार ?

पुण्यातल्या हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना आणि इतरही काही पोलिस ठाण्यांमध्ये बांग्लादेशी रहिवाशांच्या घुसखोरी प्रकरणे दाखल आहेत. यात आतापर्यंत घुसखोरीच्या प्रकरणात एकूण 29 बांग्लादेशी घुसखोरांना अटक केली होती. यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची आता पुणे पोलिस आयुक्त रितेशकुमारांनी गंभीर दखल घेतली आहे.

Bangladesh Passport
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

याबाबत आता पासपोर्ट वितरीत करणाऱ्या संबंधित प्रशासनाला पोलिसांकडून सूचना दिल्या आहेत. पुणे पोलिस सहायक आयुक्त रमाकांत माने आणि पासपोर्टसंबंधी पडताळणी पोलिस विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांना सुचना दिल्या आहेत. याबाबत आता कडक कारवाई करण्याचा पावलं उचलले जाणार आहेत.

घुसखोरांना पासपोर्ट मिळवून देणाऱ्या टोळ्या -

अनधिकृतपणे भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना, घुसखोरांना भारतीय पारपत्र मिळवून देणाऱ्या टोळ्या अनेक ठिकाणी सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच, पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जांची कसून चौकशी करावी, अर्ज करणाऱ्या नागरिकांची व्यक्तिगत चौकशी करण्यात यावी. तसेच, अर्जदाराच्या निवासस्थानाच्या आजूबाजूला- परिसरात चौकशी करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com