गोपीचंद पडळकर गट अन् शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात जोरदार राडा

आटपाडीमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkarsarkarnama
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे गट आमने-सामने आले. यावेळी शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांची गाडी फोडली. तर त्याच्या ताफ्यातील इतर गाड्यांच्याही काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Gopichand Padalkar
११ महिन्यांच्या शेतकरी आंदोलनानंतरही मोदी सरकार कृषी कायद्यांवर ठाम

या हल्ल्यामुळे काहीजण जखमी झाले आहेत. आटपाडी मधील साठे चौकात ही घटना घडली आहे. आटपाडीमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर त्यामुळे आटपाडीमध्ये पोलीसाची कुमक वाढवण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन हा वाद झाला आहे.

हेही वाचा :

सरकार तुमचं आहे, चौकशी करा, मगच बोला ; दानवेंचा रोहित पवारांना सल्ला

जालना : अहमदनगर दुर्घटना प्रकरणी रोहित पवारांनी केलेल्या टिकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरकारचं त्यांचे आहे, या घटनेची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच अशा प्रकारचे वक्तव्य रोहित पवार यांनी करायला हवे होते. त्यांचा आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे केंद्रीय रेल्वे कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून राज्य सरकारनं त्याकडे सहानुभूतीने पहावे, असेही दानवे म्हणाले. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागून काल अकरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकारण सुरु झाले आहे.

Gopichand Padalkar
आर्यन खान ड्रग्जप्रकरण आंतरराष्ट्रीय कटाचा तर भाग नाही ना? : मुनगंटीवारांनी व्यक्त केली भीती

हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेले व्हेंटिलेटर हे पीएम केअरमधून मिळाल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. रोहित पवार यांच्या या टीकेला रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी संयमाने स्टेटमेंट करायला हवे, अशा पद्धतीने ही राजकारण करायची वेळ नाही.

रोहित पवार यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत असून सरकार त्यांचं आहे, आग प्रकरणाची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच त्यांनी या विषयावर वक्तव्य करावे, असा सल्ला दानवे यांनी रोहित पवार यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com