Patan : 'मविआ' नेत्यांकडून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न... देसाई

शंभूराज देसाई Shambhuraje Desai म्हणाले, मुंडे Dhananjay Munde यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. त्यांच्या सरकारच्या काळात प्रकल्प Project बाहेर गेले आहेत.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

सातारा : शिंदे-फडणवीस व सरकारमध्ये वाद लावण्यासाठी वक्तव्य केली जात आहेत. परंतू कितीही प्रयत्न केले, दररोज अशी वक्तव्ये झाली तरी शिंदे, फडणवीस सरकारवर त्याचा तीळमात्र, परिणाम होणार नाही, असे ठाम मत उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे नेते धनंजय मुंडे, चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस मुख्यमंत्री असते तर प्रकल्प गुजरातला गेले असते का, शिंदे सरकार असल्याने असं घडल्याचे म्हटले होते. यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मुंडे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. त्यांच्या सरकारच्या काळात हे प्रकल्प बाहेर गेले आहेत. माहितीच्या अधिकारात देखील उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या कार्यकाळात हे सगळं घडले आहे. हाय पॉवर समिती, कॅबिनेटच्या बैठका झाल्या नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

Shambhuraj Desai
मुख्यमंत्र्यांनी इशारा देताच धनंजय मुंडे आंदोलनातून गायब!

चंद्रकांत खैरे प्रवाहाच्या बाहेर

कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमच्या सरकारवर याचा परिणाम होणार नाही, असेही मंत्री देसाईंनी नमूद केले. मंत्री देसाई म्हणाले, चंद्रकांत खैरे प्रवाहाच्या बाहेर आहेत. ते देखील भडक वक्तव्य करून आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत. अपात्रतेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल. त्यामुळे पुढचा प्रश्न येणार नाही असे मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai
चंद्रकांत खैरे म्हणाले, बच्चू कडूंनी आता माघार घेऊ नये, तर खडसे म्हणतात, शिंदेंनाच माहीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com