मुख्यमंत्र्यांनी इशारा देताच धनंजय मुंडे आंदोलनातून गायब!

सोमवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा दया, करुणा दाखवली; पण परत परत करुणा दाखवता येणार नाही, असा सूचक इशारा दिला होता.
Mahavikas Aghadi Leader
Mahavikas Aghadi LeaderSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्षाचे आमदार पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) विरोधात आंदोलन करत आहेत. विशेषतः शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे. ‘ताट वाटी चलो गुवाहाटी’, ‘पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके’, अशा बोचणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आघाडीवर होते. पण सोमवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde) यांनी देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा दया, करुणा दाखवली; पण परत परत करुणा दाखवता येणार नाही, असा सूचक इशारा दिला होता. त्यानंतर आज आंदोलनातून मुंडे गायब झाल्याचे दिसले. (Eknath Shinde gave an implicit warning then Dhananjay Munde disappeared from movement)

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या प्रस्तावावर बोलताना माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुद्देसूद मांडणी करत एकनाथ शिंदे सरकारला धारेवर धरले होते. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत करत बिल मागे घ्यावी, असे मागणी केली होती. त्यानंतर बिलाच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ’काही लोक रोज बाहेर दोनच शब्द बोलत आहेत. दुसरा मुद्दाच नाहीये. परवा काहीतरी ‘ताट वाटी; चलो गुवाहाटी’.

Mahavikas Aghadi Leader
‘शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत; पण सरकार आपल्याच मस्तीत वागतंय’

धनंजय मुंडेही तिकडे होते. इतकं जोरात बोलत होते की, असं वाटतं होतं किती वर्षांचे शिवसैनिक आहेत. बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते. घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. तुमचाही सगळा प्रवास मला माहितीये ना. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रेम, दया, करुणा दाखवली. पण परत परत दाखवता येणार नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

Mahavikas Aghadi Leader
'शिवसेनेला कुणबी सेनेची हाय लागलीय'

दरम्यान, पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून दररोज आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान घोषणा देण्यामध्ये आमदार धनंजय मुंडेंही अग्रभागी होते. पण, विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी गर्भित इशारा देताच धनंजय मुंडे आज आंदोलनातून गायब झाल्याचे दिसले. महाआघाडीच्या नेत्यांनी आजही विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. मात्र, त्या धनंजय मुंडेंची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली. धनंजय मुंडे कुठे आहेत? अशी कुजबूज विधिमंडळ परिसरात ऐकायला मिळाली.

Mahavikas Aghadi Leader
बंगल्यांचे वाटप : विखे-पाटलांना रॉयलस्टोन, राठोड मुख्यमंत्र्यांचे शेजारी, बहुचर्चित रामटेक केसरकरांच्या वाट्याला!

विधान भवनात उशिरा पोहोचलेल्या धनंजय मुंडेंना आंदोलनातील अनुपस्थितीबद्दल माध्यमांनी प्रश्न केला असता मुंडेंनी त्यावर बोलण्यास नकार दिला. नंतर बोलतो असं म्हणत ते सभागृहात निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com