श्रीगोंदे ( अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण तापले आहे. Nagwade Sugar Factory Election: Supporters have the upper hand over Babanrao Pachpute
नागवडे कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमध्ये फुट पडल्याने रंगत वाढली आहे. नागवडे यांचे कारखान्यातील प्रमुख विरोधक असणारे आमदार बबनराव पाचपुते यांची भुमिका अजून गुलदस्त्यात असल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. याच पार्श्वभुमीवर पाचपुते यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत या निवडणुकीबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर आल्याने अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमदार पाचपुते यांना देण्यात आल्याची माहिती समजली.
नागवडे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून नागवडे गटातच फूट पडल्याने सगळी निवडणूक कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे विरुध्द केशवराव मगर व त्यांचे सहकारी अशी चर्चेत आली आहे. मुळात या निवडणूकीत कायमच आमदार पाचपुते यांचा गट प्रमुख विरोधक राहिला आहे. मात्र सध्या त्यांची भुमिका अस्पष्ट असल्याने कार्यकर्तेही हवालदिल आहेत.
याच पार्श्वभुमीवर काल बुधवारी ( ता. 10 ) रात्री काष्टी येथील पाचपुते यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची बैठक झाली. त्यात कारखाना निवडणुकीत पाचपुते गटाची, भाजपची भुमिका काय राहिल याविषयी चर्चा झाली.
बैठकीला उपस्थितीत असणाऱ्या काही प्रमुखांनी विधानसभेला राजेंद्र नागवडे यांनी मदत केल्याने आपण कारखान्याला त्यांना मदत करायला हवी अशी भुमिका मांडली. तर काही लोकांनी विधानसभेला नागवडे यांचे बहुतेक कार्यकर्ते विरोधात राहिल्याने आपले मताधिक्य घटल्याने आपण कारखान्यात विरोधात भुमिका घेवू असे सांगितले.
या प्रतिक्रियेसोबत आपल्या गटाची शक्ती मोठी असून आपल्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मंडळ करु, ज्यांना आपल्या सोबत यायचे आहे ते येतील अन्यथा आपण लढू अशीही चर्चा झाली.
लवकरच भुमिका जाहीर करणार
बैठकीत एकमत होत नसल्याने आमदार बबनराव पाचपुते यांना याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, काही दिवस ते रुग्णालयात उपचारासाठी जात असून परतल्यानंतर कारखान्याबाबत भुमिका जाहीर करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.