Babanrao Gholap Shridi Loksabha : 'शिर्डी' लोकसभेसाठी घोलपांनी ठोकला शड्डू; ठाकरेंची धाकधूक वाढली

Thackeray- shinde Politics : बबनराव घोलप समर्थकांनी आज (17 सप्टेंबर) मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जमण्याचे आवाहन केले आहे.
Babanrao Gholap Shridi Loksabha :  'शिर्डी' लोकसभेसाठी घोलपांनी ठोकला शड्डू; ठाकरेंची धाकधूक वाढली

Nagar Political News : माजी मंत्री बबनराव घोलप समर्थकांनी आज (17 सप्टेंबर) मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जमण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणी जमून स्व. ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार असून, या कार्यक्रमास स्वतः घोलप उपस्थित असणार आहेत. यानिमित्ताने बबनराव घोलप शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी शक्तिप्रदर्शनातून आपला दावा अजून पक्का करणार असले तरी यामुळे उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढणार आहे. माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनीही याच उमेदवारीच्या भरवशावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जातेय.

माजी मंत्री बबनराव घोलप यांना शब्द देऊन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही शिर्डी लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याचे बोलले जाते आहे. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना घोलप यांनी गेल्या वर्षी शिवसेनेतील पडझडीनंतर स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडून शिर्डी लोकसभेसाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्याने आपण मतदारसंघात जोमाने काम करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. शिर्डी लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Babanrao Gholap Shridi Loksabha :  'शिर्डी' लोकसभेसाठी घोलपांनी ठोकला शड्डू; ठाकरेंची धाकधूक वाढली
RSS On Women Reservation : संसद अधिवेशनापूर्वी RSS ने केले 'महिला आरक्षणा'चे सूतोवाच; मोदी सरकार विधेयक आणणार ?

आपल्याला अमरावती आणि शिर्डी या राखीव मतदारसंघातून निवड करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, नाशिक-शिर्डीनजीक असल्याने आपण त्याचवेळी शिर्डी लोकसभेची मागणी केली आणि आपल्याला त्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे घोलप यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी जाहीरपणे लोकसभा उमेदवारीबद्दल वक्तव्य केले नसले तरी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत त्यादृष्टीने गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बबनराव घोलप शिर्डी उमेदवारीवरून साशंक झाल्याने त्यांनी पक्षाकडे याबद्दल दबाव वाढवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज घोलप समर्थकांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर मोठ्या शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Babanrao Gholap Shridi Loksabha :  'शिर्डी' लोकसभेसाठी घोलपांनी ठोकला शड्डू; ठाकरेंची धाकधूक वाढली
Eknath Shinde Vs Thackeray : 'संभाजीनगर नामकरण' निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना राहिला होता का ?' शिंदेंनी डिवचलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com