Eknath Shinde Vs Thackeray : 'संभाजीनगर नामकरण'च्या निर्णयाचा अधिकार उद्धव ठाकरेंना राहिला होता का ?' शिंदेंनी डिवचलं...

Eknath Shinde ON Sambhajinagar Name change : "महायुतीचं सरकार आल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला.."
Eknath Shinde Vs Thackeray
Eknath Shinde Vs Thackeray Sarkarnama

Sambhajinagar News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. दरम्यान, राज्य मंत्रिमडळाची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून जवळपास ५९ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा करण्यात आली. याच संदर्भाने पत्रकार परिषदेत बोलत असताना शिंदे यांनी जिल्ह्यांच्या नामांतराबाबत महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Vs Thackeray
Nana Patole News : '' मराठा समाजाला मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी आरक्षण तर दिलेच नाही, पण पोलिसांच्या...''; पटोलेंचा घणाघात

मुख्यमंत्री म्हणाले, "काल आपण इथे मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक घेतली. कालच्या पत्रकार परिषदेत सर्व प्रकल्पांची माहिती दिली. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ४५ हजार कोटींच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. वाहून जाणारं पाणी दुष्काळाचा दाह सोसणाऱ्या मराठवाड्याकडे वळवण्यासाठी योजनांची आखणी आहे. या कामात पंतप्रधान मोदींचं सहकार्य मिळेल. मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार आहे. "

यानंतर शिंदेंनी जिल्ह्यांच्या नामांतराच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. शिंदे म्हणाले, "काल मी काही वृत्तवाहिन्यांवर पाहिलं. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं जिल्ह्यांचं नामकरण आम्ही केलं, असं काही जण म्हणत आहेत. मात्र, महायुतीचं सरकार आल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला, याबाबत केंद्र सरकारकडे कायदेशीर पूर्ततेसाठी प्रयत्न केले."

Eknath Shinde Vs Thackeray
Nana Patole On Cabinet Meeting: शिंदे-फडणवीस बोलून झाले मोकळे अन् जनतेच्या हाती भोपळे; 'कॅबिनेट'वरून पटोलेंची कोपरखळी

"जे आज म्हणत आहेत की, आमच्या कॅबिनेटने निर्णय घेतला, मुळात त्यांना त्यावेळी कॅबिनेट बैठक घेण्याचा अधिकार राहिला होता का? ते तेव्हा अल्पमतात होते. मात्र, जेव्हा सत्तेमध्ये पहिले अडीच वर्षे होते तेव्हा हात बांधून का बसले होते? पण, आम्ही सरकारमध्ये येताच याची कायदेशीर पूर्तता केली आणि आता या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे, " अशा शब्दांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

(Edited By- Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com