Babanrao Shinde : अजित पवारांसोबत कायम राहण्याचे बबनराव शिंदेंचे स्पष्ट संकेत; ‘पूर्वीपासून ज्या फळीत काम केले, त्याच...’

Sawand Melava : माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी कानपिचक्या देताना माढा तालुक्यातील 107 गावांनीच घात केल्याचा आरोप केला. तसेच, सभेला आलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या गावातून शिंदे यांना लीड दिले नसल्याचे सांगितले.
Ajit Pawar-Babanrao Shinde
Ajit Pawar-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 December : विधानसभा निवडणुकीत माढ्यातून माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. निकालाच्या महिनाभरानंतर माढा तालुक्यातील पिंपळनेरमध्ये संवाद मेळावा झाला. त्यात समर्थकांनी ‘जो पक्ष विधान परिषद देईल, त्या पक्षात बबनराव शिंदे यांनी प्रवेश करावा’ असा आग्रह केला. मात्र बबनदादांनी (Baban Shinde) ‘मी पूर्वीपासून ज्या फळीमध्ये काम करत आहे, भविष्यकाळातही त्याच फळीसोबत काम करणार आहे,’ असे सांगून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पिंपळनेर येथील संवाद मेळाव्यात बोलताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णू हुबे यांनी पक्षप्रवेशबाबत विधान केले होते. विधान परिषेदचा शब्द दिल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही. जो पक्ष रणजितसिंह शिंदे यांना विधान परिषद देईल, त्याच पक्षात प्रवेश करायचा. मग तो शब्द एकनाथ शिंदेंनी देऊद्यात, अजितदादांनी (Ajit Pawar) देऊद्यात किंवा भाजपवाल्यांनी देऊद्यात. काहीही किंमत मोजायला लागली तरी मोजा; पण बबनदादा विधानसभेतील पराभव धुवून काढण्यासाठी रणजितसिंह शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवा, असे आवाहन त्यांनी केले होते.

दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी कानपिचक्या देताना माढा तालुक्यातील 107 गावांनीच घात केल्याचा आरोप केला. तसेच, सभेला आलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या गावातून रणजितसिंह शिंदे यांना लीड दिले नसल्याचे सांगितले. आगामी निवडणुका इथं बसलेल्या लोकांच्या मदतीने आपण जिंकू शकत नाही. त्यासाठी नव्याने माणसं जोडली पाहिजेत, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar-Babanrao Shinde
Babanrao Shinde : बबनदादा...विधान परिषदेचा शब्द घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करू नका; संवाद मेळाव्यात समर्थक आक्रमक

दरम्यान, संवाद मेळाव्यानंतर माध्यमाशी बोलताना बबनराव शिंदे यांंनी पक्षांतराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, माढा विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आहे. पण, आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात.

संवाद मेळाव्यात बोलताना घड्याळ न घेणं महागात पडलं, असे मत काही कार्यकर्त्यांनी मांडलं. त्यावर माजी आमदार बबनराव शिंदे म्हणाले, लोक दोन्ही बाजूंनी बोलत असतात. घड्याळ न घेता तुम्ही निवडणूक जिंकू शकता आणि घड्याळ घ्यायला पाहिजे होते, असे बोलत असतात, त्यामुळे त्यावर फार भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

Ajit Pawar-Babanrao Shinde
Uttam Jankar : अजितदादांचे 12, तर शिंदेंचे 18 अन्‌ भाजपचे केवळ 77 आमदार निवडून आलेत; जानकरांनी मांडले ईव्हीएमचे गणित (Video)

पक्ष बदलाच्या भूमिकेबाबत मला आज काही बोलता येणार नाही. पण, मी पूर्वीपासून ज्या फळीमध्ये काम करत आहे, भविष्यकाळातही त्याच फळीसोबत काम करणार आहे, असे सांगून माजी आमदार बबनराव शिंदेंनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com