Bachchu Kadu on Ravi Rana : '...म्हणून रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव झाला' ; बच्चू कडुंचा खळबळजनक दावा!

Bachchu Kadu on Navneet Rana Defeat : '...त्यामुळे पाडणे किंवा निवडून येणे यामध्ये आता रवी राणा यांनी बोलणे योग्य नाही.' असा टोलाही लगावला आहे.
Bachhu kadu Vs Ravi Rana
Bachhu kadu Vs Ravi Rana Sarakarnama

Karad Political News : 'मी 20 वर्षे कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या जीवावर चार वेळा निवडून आलो आहे. त्यामुळे पाडणे किंवा निवडून येणे यामध्ये आता रवी राणा यांनी बोलणे योग्य नाही. मी राणांसारखा भाजपचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा पाठिंबा घेवून निवडून आलेलो नाही. मी स्वतःच्या जीवावर निवडून आलेलो आहे.'

तसेच, 'स्वाभिमान पार्टीनेच भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाडले आहे. घरचीच व्यक्ती मोठं होताना रवी राणा पाहू शकले नाहीत.', असे खळबळजनक वक्तव्य प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी कराड येथे केला.

कोकण दौऱ्यावरुन पुण्याला जात असताना आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांच्याशी कराड येथे पत्रकारांनी संवाद साधला. याप्रसंगी मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानुदास डाईंगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार बच्चू कडू म्हणाले, 'नवनीत राणा सतत टी. व्ही. वर दिसायच्या. त्यामुळे राणा जरा दबून गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. स्वाभिमान पार्टीनेच भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाडले आहे.

घरचीच व्यक्ती मोठं होताना रवी राणा पाहु शकले नाहीत. नवनीत राणा भाजपमध्ये आणि त्यांचे पती स्वाभिमान पार्टीत असल्याने लोकांत संभ्रम निर्माण होवून फसगत झाली. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला.'

Bachhu kadu Vs Ravi Rana
Video Ravi Rana Vs Bacchu Kadu : बच्चू कडू 'ब्लॅकमेलर' नंबर वन; पत्नीच्या पराभवानं 'घायाळ' रवी राणांनी सगळंच काढलं

ते म्हणाले, 'खासदार वानखेडे यांना विकास कामासाठी निधी आणण्यासाठी काय करावे हे माहिती आहे. त्यामुळे रवी राणांनी (Ravi Rana) त्यांना सांगायची गरज नाही. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे उठसुट आरोप करायचे सुरु आहे. त्यांना पराभव पचवता आलेला नाही आणि स्वतःमुळे पराभव झाला हे राणांना समजले आहे.'

याशिवाय 'आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी 108 वेळा बच्चू कडुचे नाव घेतले. त्यामुळे मलाच त्यांच्याकडे डॉक्टरला पाठावावे लागेल. भाजपचे पदाधिकारी राणा यांना उमेदवारी देवू नये असे म्हणत होते. बायको भाजपात आणि हे स्वाभिमानमध्ये राहिले. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलेले नाही. त्यांनी विरोधात मतं दिले आहेत.' असंही कडू म्हणाले आहेत.

Bachhu kadu Vs Ravi Rana
Navneet Rana : मी हारूनही जिंकले! नवनीत राणा असं का म्हणाल्या...

तसेच 'उठसुठ मला बोलले की त्यांचा मोठा नेता खुश होतो म्हणुन ते माझ्यावर टीका करत आहेत. मोठ्या नेत्याला खुश करण्यासाठी ते आरोप करत राहतात. त्यांच्या आरोपात आता काहीही तथ्य राहिलेले नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे आता त्यांना कोर्टातुनच उत्तर देणार आहे, त्याना सोडणार नाही.' असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com