Amravati Political News : अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी माजी खासदार नवनीत राणांचा पराभव केला. या पराभवानंतर नवनीत राणांनी आठवड्यानंतर प्रथमच प्रतिक्रिया दिली. मी हारूनही जिंकली आहे, असे राणांनी सांगितले. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून एका कार्यकर्ती म्हणून कायम काम करत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सतत प्रसारमाध्यमांच्या गराड्यात असणाऱ्या राणा पराभवानंतर मात्र शांत होत्या. त्या थेट दिल्लीतील पंतप्रधान पदाच्या शपथविधीतच दिसल्या. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पंतप्रधान मोदींच्या Narendra Modi शपथविधीला गेले होते. मी भाजपची एक कार्यकर्ती म्हणून सोहळ्याला उपस्थित होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेताना माझ्या मनात जिंकल्याचीच भावना होती. त्यामुळे अमरावतीत हारले असले तरी मी जिंकलेलीच आहे, अशी भावना राणांनी यावेळी व्यक्त केली.
यापूर्वी अमरावतीच्या जनतेने अपक्ष म्हणून निवडून दिले होते. यावेळी का नाकारले, याचेही आश्चर्य राणांनी व्यक्त केले. गेल्या पाच वर्षांपासून मी प्रामाणिकपणे काम केले आहे. अपक्ष असतानाही मोठ्या फरकाने 2019 मध्ये निवडून दिलेल्या जनतेने यावेळी मला का थांबवले हे समजत नाही. 'लिटल बेंड इज नेव्हर एन्ड', असे म्हणत नवनीत राणांनी मैदानात असल्याचेही सूचित केले आहे.
नवनीत राणांचा Navneet Rana पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. यातून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चर्चा आहे. यावर त्या म्हणाल्या, निवडणुकीत मनापासून लढले. शिवाजी महाराज सांगतात की लढणारे मागे वळून पाहत नाहीत. त्यामुळे भविष्याबाबत जास्त विचार करत नाही. आगामी काळात नेत्यांशी चर्चा करून वाटचाल करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसने खोटा प्रचार केल्यानेच आपला पराभव झाल्याचा आरोप राणांनी केला. काही लोक जिंकण्यासाठी येतात तर काही दुसऱ्याचा पराभव करण्यासाठी येतात. महाविकास आघाडीने खोटे बोलून प्रचार केला. प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून भाजप संविधान बदलणार असल्याचे त्यांनी लोकांना पटवून दिले. राहुल गांधींनी Rahul Gandhi हातात संविधान घेऊनच तसे सांगितले. त्यांनी मागासवर्गीय लोकांना खोटे बोलून मतदान वळवले, असे थेट बोलून राणांनी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.