Solapur : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यात करमाळा, दक्षिण आणि सोलापूर शहर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे बच्चू कडू हे भाजप-शिवसेनेबरोबच काँग्रेसचे टेन्शन वाढविणार, हे मात्र नक्की. (Bacchu Kadu's Prahar Janashakti Party will contest election from three constituencies in Solapur)
प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अनिल चौधरी हे पक्षासंघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी चौधरी यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे शिंदे-फडणवीसांचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत. (Prahar Janashakti Party)
माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे शिवसेना युतीबरोबर आहेत. त्यांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आली होता. मात्र, अद्याप त्यांची मंत्रीपदावर वर्णी लागलेली नाही, त्यामुळे कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच बच्चू कडू यांनी राज्यातील विधानसभेच्या १५ जागा आणि लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीसांचे टेन्शन वाढविले आहे.
अनिल चौधरी म्हणाले की, बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार राज्यात प्रहार संघटना मजबूत करण्याचे काम चालेले आहे. राज्यात आपण लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक कुठे कुठे लढू शकतो, याचा आढावा आम्ही घेत आहोत. त्यानुसार आम्ही आज सोलापुरात आढावा घेत आहोत. आम्ही पंधरा विधानसभा आणि दोन लोकसभेच्या जागा लढवणार आहोत, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात आम्ही तीन विधानसभेच्या जागा लढणार आहोत. त्यात करमाळा, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर मध्य या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभेबरोबरच जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आहोत. आम्ही पंधरा जागांची मागणी शिवसेना-भाजपकडे मागणी करणार आहोत. ती मागणी मान्य न केल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
सोलापूरचे अधिकारी कर्तृत्वशून्य
सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री होते, पण सोलापूर परिस्थिती कायम खराब राहिलेली आहे. अवजड वाहनांमुळे रस्ते अत्यंत खराब आहेत. पाण्याचे नियोजन तर शून्य आहे. उजनी धरणातून पाण्याचे नियोजन करता येते. पण अधिकारी ते करत नाहीत, दुर्लक्ष करतात. येथील अधिकारी हे कर्तृत्वशून्य आहेत. त्यामुळे नागरिकांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.