Solapur News: विधानसभा निवडणुकीत महायुतीची साथ सोडून वेगळी चूल मांडण्याच्या विचारात असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी सोलापूर जिल्ह्यात नशीब आजमावणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 6 विधानसभेवर बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Janshakti Party) देणार उमेदवार आहेत.परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या बॅनरखाली प्रहार तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात 6 जागा लढणार आहेत.
सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण,अक्कलकोट,पंढरपूर - मंगळवेढा आणि करमाळा या जागांवर 'प्रहार'चे उमेदवार रिंगणात असतील, अशी माहिती आहे. मुस्लिम समाजाला उमेदवारी देणार असल्याचे प्रहारकडून सांगण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटक अजित कुलकर्णी यांनी ही दिली माहिती दिली.
महायुती सरकारला कधी इशारा तर कधी कानपिचक्या देत बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगळी चूल मांडण्याचेही संकेत दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी विधानसभेसाठी या सहा जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. काल (रविवारी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापुरातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
जिल्ह्यातील 11 मतदारसंघांतून तब्बल 72 जणांना वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे या 11 मतदारसंघात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यासाठी 72 जणांनी आज मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये 64 पुरुष, तर आठ महिला इच्छुकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीचीही चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह आदी काही नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.
“काँग्रेस आणि भाजपाने लुटणारी व्यवस्था निर्माण केली. त्या भाजप आणि काँग्रेसला उखडून फेकण्याचे दिवस आले आहेत”, असं विधान बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नुकतेच एका सभेत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.