Ambernath Assembly Election: तीन टर्म आमदार असलेल्या किणीकरांचा विजयरथ स्वपक्षातूनच रोखला जाणार?

Shiv Sena Shinde Group Arvind Walekar Vs MLA Dr.Balaji Kinikar: संदीप भराडे यांच्या 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले भराडे यांचे बॅनर्सही अंबरनाथ शहरात कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार होतात? की स्वपक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो?
Balaji Kinikar, Eknath Shidne
Balaji Kinikar, Eknath ShidneSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: शिवसेनेत फूट पडल्यानंतरही शिंदे गटातही दोन गट पडल्याचे अंबरनाथ विधानसभेत चित्र आहे. अंबरनाथ विधानसभा कोण लढणार, यावरुन विद्यमान आमदार शहरप्रमुखांमध्ये जुंपली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर (MLA Dr.Balaji Kinikar)असे दोन गट पडले आहेत.

आमदार बालाजी किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचे काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही, अशी ठाम भूमिका वाळेकर (Arvind Walekar) गटाने घेतली आहे. उमेदवार बदलून दिल्यास आम्ही मन लावून काम करू आणि उमेदवार निवडून आणू, असाही प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे वाळेकर गटाने ठेवल्याची विश्वसनीय माहिती आहे.

बालाजी किणीकर हे तीन टर्मचे आमदार आहेत,ते मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. वाळेकर गटाने त्यांना विरोध केला असता तरी येथील उमेदवार बदलला जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळेकर गट यंदा आमदार किणीकर यांच्या विरोधात संदीप भराडे यांना मैदानात उतरवणार, हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा राज्यकीय वर्तुळात आहे.

विधानसभा निवडणुकीत किणीकर यांना उमेदवारी दिल्यास काम न करण्याचा निर्णय वाळेकर यांनी घेतला आहे. त्यातच निवडणूकीच्या तोंडावर वाळेकर यांनी आपला पत्ता उघडला आहे. त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केले आहे.

त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले बॅनर्स शहरात लावले आहेत. शिंदे गटातील गटबाजीचे राजकारण यामुळे उघड झाले आहे. अंबरनाथ मध्ये कोणाचे पारडे वरचढ ठरते हे लवकरच समजेल. या सगळ्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीत शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा गट उघडपणे आमदार डॉ. किणीकर यांच्या विरोधात काम करणार हे निश्चित आहे.

Balaji Kinikar, Eknath Shidne
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे काय आहे पुणे कनेक्शन

आमदार किणीकर यांना वाळेकर गटाकडून कायम विरोध होत आला आहे. त्यामुळे किणीकर यांच्या विरोधात वाळेकर गटाकडून कुणाला उभं केलं जाणार, याची चर्चा रंगली होती. अखेर शहरप्रमुख वाळेकर यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक ॲड. संदीप भराडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले भराडे यांचे बॅनर्सही अंबरनाथ शहरात लावले आहेत. बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार होतात? की स्वपक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अंबरनाथ विधानसभेत 15 वर्षांपासून एकच चेहरा दिला जात असून हा मतदारसंघ राखीव आहे. मात्र या मतदारसंघात हवी तशी कामं झालेली नसल्याचं सांगत भराडे यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पक्षाने जर तिकीट दिलं नाही, तर वरिष्ठ सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढची वाटचाल ठरवू, पण निवडणूक लढवायचीच आहे, असा ठाम निर्धार भराडे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com