Karmalas Bagal Group News : करमाळ्याचा बागल गट 'या' दिवशी भाजपामध्ये प्रवेश करणार!

Digvijay Bagal way to BJP : बागल गटाने भाजपमध्ये प्रवेश करणे ही करमाळा तालुक्याच्या राजकारणातील मोठी घडामोड समजली जात आहे.
Digvijay Bagal
Digvijay BagalSarkarnama

Bagal Group and BJP : 'रश्मी बागल यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात भाजपचे नेते श्रीकांत भारती, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमंत्रित केले असून, तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी बागल गट भाजपमध्ये प्रवेश करत आहे. बागल गट भाजपमध्ये प्रवेश करत असताना बागल गटाकडून भाजपकडे कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात आलेली नाही किंवा अट घालण्यात आलेली नाही.' असे प्रतिपादन बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले आहे.

दिग्विजय बागल यांनी शनिवार (ता.24) रोजी भाजप पक्ष प्रवेशाबाबात भुमिका जाहीर केली आहे. गेली अनेक दिवस बागल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा होत्या आणि शनिवारी अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बागल गटाने भाजपमध्ये प्रवेश करणे ही करमाळा तालुक्याच्या राजकारणातील मोठी घडामोड समजली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Digvijay Bagal
Nana Patole On Eknath Shinde : "शिंदेंच्या सरकारला 'पन्नास खोके-एकदम ओके' म्हणणे साताऱ्याचा अपमान..."

2009 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा बागल गटाचा प्रवास झाला आहे. मंगळवार (ता. 27 )रोजी मुंबई येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात येणार आहे. बागल यांच्या प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, भाजपचे नेते आमदार श्रीकांत भारती यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांचे वडील दिवंगत दिगंबरराव बागल यांनी 1995 व 1999 असे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले व ते राज्यमंत्री देखील होते. 2004 ला दिगंबरराव बागल यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पराभव केला. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2005 रोजी दिगंबरराव बागल यांचे निधन झाले.

रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्या आई 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार होत्या. त्यानंतर 2014 ला राष्ट्रवादी कडून करमाळा विधानसभा लढवत असताना रश्मी बागल यांचा पराभव झाला. त्यानंतर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी 2019 ला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

Digvijay Bagal
Nana Patole Vs Dhananjay Mahadik: महाडिकांना पटोलेंचा सूचक इशारा; 'आम्हीही बोलू शकतो, पण...'

त्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून 'आदिनाथ' व 'मकाई'ला मदत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात सर्वच पक्षापासून सुरक्षित अंतरावर राहण्याची भूमिका बागल गटाने घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र गेली अनेक दिवसापासून बागल भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

त्यानंतर मकाई सहकारी साखर कारखान्याच्या वाढलेल्या अडचणी पाहता कारखान्याला आर्थिक मदत मिळवण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी प्रयत्न केले. मात्र जाणीवपूर्वक राजकीय हेतूने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मकाई कारखान्याच्या विरोधात ऊस बिले मिळावीत म्हणून तीव्र आंदोलन करण्यात आली आणि आणखीनही आंदोलने सुरूच आहेत. दत्त कला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ ,शेतकरी नेते दशरथ कांबळे ,पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. राहुल सावंत यांनी मकाईबाबत तीव्र आंदोलन उभे केले आहे.

Digvijay Bagal
Lok Sabha Election : निवडणुका येताच उंडाळकरांची बदलली वेशभूषा; पॅन्ट-शर्टमध्ये दिसणारे सलवार-कुर्ता अन् जॅकेट...

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बागल गट सध्या प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बागल हे भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे , माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, कलीम काझी यांच्यासह आदिनाथ व मकाईचे आजी-माजी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रस्ताविक बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले. मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी मानले.

कोणी ना कोणी गॉडफादर असावा -

'राजकारण करत असताना कोणी ना कोणी गॉडफादर असावा लागतो. भाजपामध्ये नसताना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपाचे नेते श्रीकांत भारती यांनी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्यासह बागल गटाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.' असं दिग्विजय बागल म्हणाले आहेत.

तर करमाळा तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवरती मदत व्हावी या दृष्टिकोनातून भाजपामध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. असं विलासराव घुमरे म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com