Satara Congress News : शुक्रे आयोगाच्या अहवालात सहा लाख लोकांचा 27 दिवसात सर्व्हे केल्याचे सरकारचे सांगणे म्हणजे थोतांड आहे. राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. भाजपने हुकूमशाही पद्धतीने आपले निर्णय राबवून शाहू, फुले, आंबेडकर व महाराष्ट्राच्या शिवविचाराचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे असून त्यांच्या सरकारला खोके सरकार म्हटले जाते हा सुद्धा सातारा जिल्ह्याचा अपमान आहे. आरक्षणमुक्त भारत हा भाजपचा छुपा अजेंडा असून त्यामुळे केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करत आहे, अशी सडेतोड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Latest Marathi News)
जिल्हा काँग्रेस भवनात पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.तत्पूर्वी शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.यावेळी काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग नाना चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पटोले म्हणाले, भाजपने राज्यात आरक्षणाचा बागलबुवा तयार केला आहे. धनगर आरक्षणाच्या संदर्भात आलेला रिपोर्ट उच्च न्यायालयाने नाकारला. कारण त्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्राचा अहवाल नव्हता. धनगरांना आदिवासी जमातीमध्ये समावेश देण्याकरता आवश्यक प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळे धनगर आरक्षण नाकारले. भाजप मराठा व ओबीसी आदिवासी व धनगर यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करत आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भातही मराठा व इतर मागासवर्गीय यांच्यामध्ये विनाकारण मतभेद निर्माण केले जात आहेत. शुक्रे आयोगाचा अहवालामध्ये सहा लाख लोकांचा 27 दिवसात सर्वे करण्यात आला हा अहवाल सुद्धा थोतांड आहे.मराठा आरक्षणाच्या विषयावर सुद्धा राज्य शासनाने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे,म्हणून जरांगे यांच्यावर आम्ही भाष्य करणार नाही. मात्र, भाजपने हुकूमशाही पद्धतीने आपले निर्णय राबवून शाहू, फुले, आंबेडकर व महाराष्ट्राच्या शिवविचाराचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे आहे त्यांच्या सरकारला खोके सरकार म्हटले जाते हा सुद्धा सातारा जिल्ह्याचा अपमान आहे, असेही पटोले (Nana Patole) म्हणाले.
"आरक्षणमुक्त भारत हा भाजपचा (BJP) छुपा अजेंडा असून त्यानुसार त्यांची वाटचाल सुरू आहे. जातनिहाय जनगणना करण्यासाठी सुद्धा केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे. कल्याणकारी योजना राबवण्यासाठी प्रत्येक समाजाचा स्तर त्याची लोकसंख्या त्यांची आर्थिक उंची हे तपासणी गरजेचे असताना जाणीवपूर्वक ही प्रक्रिया टाळली जात आहे. मनरेगा मधून सुद्धा मजुराच्या हातात येणारे अडीचशे रुपये केंद्र शासनाने काढून टाकले आहेत. मग भाजपला देशामध्ये भिकारी समाज निर्माण करायचा आहे का, असा खरमरीत टोला पटोले यांनी लगावला.राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे 42 जागांवर एकमत झाले असून यासंदर्भातील अधिकृत दृष्ट्या लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.