बाळासाहेब मुरकुटेंच्या कार्यकर्त्यांचा ओघ गडाखांकडे : निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे.
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama

नेवासे ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद, नेवासे नगर पंचायत व नेवासे नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब मुरकुटे यांचे विश्वासू शिलेदार भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा ओघ सुरूच आहे. ( Balasaheb Murkute's activists flock to Gadakh Group : Shivbandhan in the face of elections )

नेवासे नगरपंचायतीच्या तोंडावर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे विश्वासू कार्यकर्ते व नगरपंचायत मधील 'भाजप' चे गटनेते सचिन नागपुरे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्यपद्धतीवर खुष होवून शिवबंधन बांधले आहे.

Shankarrao Gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

नेवासे नगरपंचायत मध्ये मुरकुटे गटाचे सहा नगरसेवक होते. मागील दोन महिन्यात दिनेश व्यवहारे,रणजीत सोनवणे,सीमा राजेंद्र मापारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आज गटनेते व प्रभाग पाचमधील नगरसेवक नागपुरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून प्रवेश केला असल्याने निवडणूकीच्या तोंडावर मुरकुटे गट तोंडघशी पडल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे.

मंत्री गडाख यांनी सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा भगवी शाल घालून सत्कार करत सर्वाना पक्षात योग्य न्याय दिला जाईल असे सांगितले. माजी आमदार मुरकुटे नेहमी स्वार्थाचा विचार करुन पक्षाशी एकनिष्ठ नव्हते. खालच्या पातळीवर चाललेल्या राजकारणास कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

Shankarrao Gadakh
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

उतरती कळा

मंत्री गडाख यांच्या माध्यमातून सध्या नेवासे तालुक्यातील सर्व गावात विकासकामे सुरु आहेत. या कामाने प्रभावित होवून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कार्यकर्ते गडाख गटात प्रवेश करीत आहेत. मुरकुटे यांच्या देवगावसह नेवासे,कुकाणे, घोडेगाव,सोनई येथील भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. त्यांचे पुतणे अजित मुरकुटे यांनीही शिवबंधन बांधून शिवसेनेचे काम सुरु केले आहे. तालुक्यात भाजपला उतरती कळा लागल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com