Balasaheb Patil : बाळासाहेब पाटलांपुढील अडचणी वाढणार; उदयनराजेंच्या समर्थकांने ठोकला शड्डू

Karad Vidhan Sabha Constituency : मसूरमध्ये युवकांचा मेळावा घेत खासदार उदयनराजे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढणार असून आता माघार नाही असे जाहीर केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Balasaheb Kshirsagar
Balasaheb KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Satara News : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीत उमेदवारीवरुन वाद पेटण्याची चिन्हे आहेत. आधीच भाजपचे मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे इच्छुकांच्या यादीत असताना आता खासदार उदयनराजे भोसले यांचा कट्टर समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी कराड उत्तरमधून विधानसभा लढविण्याची घोषणा केली आहे. नुकताच त्यांनी मसूरमध्ये युवकांचा मेळावा घेत खासदार उदयनराजे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढणार असून आता माघार नाही असे जाहीर केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात आता यावेळेस भाजपकडून मनोज घोरपडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे दोघे इच्छुक आहेत. अद्याप महायुतीचे जागा वाटप झालेले नाही. पण, सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात वातावरण तापू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना कराड उत्तरमधून (Karad Consticuency) चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे येथे विधानसभेसाठी भाजपच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

Balasaheb Kshirsagar
Ramesh Kadam Meet Sharad Pawar : माजी आमदाराने घेतली शरद पवारांची भेट; विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी

सध्या भाजपकडून (BJP) एक नव्हे दोन नव्हे तिन जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मनोज घोरपडे हे भाजपचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत. तर दुसरी धैर्यशील कदम हे जिल्हाध्यक्ष आहेत. आता खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनीही शड्डू ठोकला आहे. कुलदीप क्षीरसागर (Kudeep Kshirsagar) हे मसूर परिसरातील युवा नेते असून त्यांच्या मागे उदयनराजे समर्थक तरुणांची मोठी फळी आहे. नुकताच त्यांनी मसूर परिसरात मेळावा घेऊन उमेदवारी घोषित केल्याने कराड उत्तर मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

Balasaheb Kshirsagar
Samarjeetsinh Ghatge : ...त्यांचा आणि माझा संबंध संपला! समरजित घाटगे यांच्याकडून एक घाव दोन तुकडे...

खासदार उदयनराजेंचे (Udayanraje Bhosale) फोटो लावून मसूर येथे हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा कराड उत्तरमधून भाजपमध्ये संघर्ष पेटणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने मी निवडणूकीला उभा राहतोय, असे घोषित करत आता माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचेच तीन उमेदवार शड्डू ठोकून तयार आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढील अडचणी वाढणार असून खासदार शरद पवार यावर कोणता डाव टाकणार याची उत्सुकता या मतदारसंघात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com